एक्स्प्लोर

आजपासून पावसाळी अधिवेशन, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनिती

मुंबई: आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनिती आखली आहे. मंत्रिमंडळ विस्तार, कर्जत बलात्कार प्रकरण, कथित पीए लाच प्रकरणी खडसेंना मिळालेली क्लिन चीट, आंबेडकर भवन हे मुद्दे पावसाळी अधिवेशनात गाजणार असल्याची चिन्ह आहेत.   दुसरीकडे संसदेचंही पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलवण्यात आलेल्या बैठकीला सर्वपक्षीयांनी हजेरी लावली होती. या अधिवेशनात जीएसटीसह महत्त्वाच्या विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असणार आहे.   राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आकड्यांची गणितं बदलली आहेत. त्यामुळेच जीएसटी विधेयक सरकारला आता दृष्टीपथात दिसू लागलं आहे. अरुणाचलमधला आक्रस्ताळेपणा आणि धगधगतं काश्मीरचं खोरं हे दोन मुद्दे सोडले. तर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे मोठा दारुगोळा नाही.   स्मृती इराणींना बाजूला करुन मोदींनी त्या संघर्षालाही शमवलं आहे. त्यामुळे सरकारचं जीएसटी विधेयक हेच अधिवेशनात लक्ष्य आहे.   विरोधकांचा चहापानावर बहिष्कार:   दरम्यान, पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर मुख्यमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिलं.   पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचा मातोश्रीवर डिनर:   दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सपत्नीक स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. वांद्रे पोट निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मुख्यमंत्री मातोश्रीवर स्नेह भोजनासाठी आले होते. त्यानंतर गेल्या दीड वर्षात या दोन्ही नेत्यांमध्ये घरगुती जेवण झालं नव्हतं. आजपासून पावसाळी अधीवेशनाला सुरवात होते आहे. त्याआधी सत्ताधारी म्हणून विरोधकांचा सक्षमपणे सामना करण्याची रणनिती मातोश्रीतल्या डिनर टेबलवर आखल्या गेल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोहीला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोहीला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
ज्ञानेश कुमार लोकशाही बुडवतायेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन अटक करा, राहुल गांधींना पोलिसांनी उचलताच काँग्रेस आक्रमक 
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget