Monsoon 2021 : केरळमध्ये येत्या 24 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता
केरळात मान्सूनच्या (Monsoon) आगमनासाठी पूरक वातावरण असे वातावरण तयार झाले असून येत्या 24 तासात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई : भारतीय किनारपट्टी भागांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण तयार होत असतानाच दोन चक्रीवादळं निर्माण होऊन गेली असली, तरीही मान्सून (MONSOON) काही वाट चुकलेला नाही. कारण, ठरल्याप्रमाणे हा दरवर्षी येणारा आणि हवाहवासा पाहुणा येत्या 24 तासात केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळातील अनेक भागात ढगाळ वातावरण झाले असून अनेक ठिकाणी पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केरळमधील 14 स्टेशनवर चांगला पाऊस होत आहे. तसेच उद्यापासून केरळात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे.
राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, कोकणात रत्नागिरी आणि मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर तसंच विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटसह पुढील तीन तासात पावसाचा इशारा हवामानविभाग तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिला आहे. मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
चांगली बातमी: मान्सून २०२१
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2021
केरळ मध्ये येत्या २४ तासात मान्सून दाखल होण्याची अधिक शक्यता, परिस्थिती मध्ये अपेक्षित अनुकूल बदल
ढगाळ वातावरण, पश्चिमी वारे जोरदार, अनुकूल पाऊस pic.twitter.com/3nI3bGDTDL
महाराष्ट्रात सरासरी 11 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस आहे. एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101 टक्के असेल असं सांगण्यात येतंय. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सुनला होणार आहे. त्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतासाठी नैऋत्य मान्सूनचा पाऊस हा अत्यंत महत्वाचा असतो. या मान्सुनच्या पावसावरच खरीप हंगामातील पिकांची पेरणी अबलंबून असल्याने भारतीय शेतीवर मान्सुनचा मोठा परिणाम होतो.
संबंधित बातम्या :
Monsoon : यंदा सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज
स्कायमेटचा दावा 'मान्सून दाखल' तर हवामान विभागाचा '3 जूनपर्यंत आगमनाचा अंदाज', सामान्य माणूस संभ्रमात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
