एक्स्प्लोर
निवडणुकांच्या तोंडावर मोदी सर्जिकल स्ट्राईक करतील : पाकिस्तान
पाच राज्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणूकीत गोमाता मतदारांना खूश करण्यासाठी मोदी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करु शकतात, असं रशिद म्हणाले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु शकतात, असं भाकित पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी वर्तवलं आहे.
पाच राज्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, म्हणून 2019 च्या लोकसभा निवडणूकीत गोमाता मतदारांना खूश करण्यासाठी मोदी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करु शकतात, असं रशिद म्हणाले.
उरी हल्ल्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. या हल्ल्यात डझनभर दहशतवादी मारले गेले होते. दहशतवादी अझहर मसूद आणि हाफिज सईद यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारत नेहमी पाकिस्तानकडे करत असतो. तसेच आंतराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण सीमांवर शांतता राखण्याची अपीलही करत असतो.
रशिद शेख यांच्या वक्तव्या नंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानला भारताच्या राजकीय घडामोडीवर बोलण्याचा काही आधिकार नसल्याचं, काँग्रेस नेते अखिलेश प्रताप यांनी सांगितलं. तर दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, वेळ पडली तर यापुढेही करु, असं भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement