एक्स्प्लोर
2019 पूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत
या योजनेसंदर्भात सरकार दरबारी हालचाली सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी जवळपास सव्वा लाख कोटी रुपये लागणार असून केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने ही योजना राबवणार आहे.
नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. तब्बल सव्वा लाखांच्या योजना आगामी काळात शेती क्षेत्रासाठी आखल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
महत्वाचं म्हणजे मोदी सरकार तेलंगणा पॅटर्न देशभर राबवण्याच्या विचारात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरचा रोषही कमी होण्याची चिन्हं आहे. बियाणं, खतं, मजुरी यांचे लाभ थेट पेरणीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं याचा यात समावेश आहे. याशिवाय मध्य प्रदेश सरकारनं राबवलेली भावांतर योजना किंवा देशभरात कर्जमाफी हे सुद्धा पर्याय केंद्र सरकारकडे आहेत.
तेलंगणा पॅटर्नअंतर्गत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेसंदर्भात सरकार दरबारी हालचाली सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी जवळपास सव्वा लाख कोटी रुपये लागणार असून केंद्र सरकार राज्यांच्या मदतीने ही योजना राबवणार आहे. या योजनेतील 70% वाटा केंद्राचा असेल तर 30% वाटा राज्य सरकारचा असेल.
आता या योजनेची कधी अंमलबजावणी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement