एक्स्प्लोर
Onion price I कांद्याला पेट्रोलचा भाव; इजिप्तनंतर तुर्कीकडूनही कांदा आयात
सध्या कांद्याला पेट्रोलचा भाव आला असून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सरकारने, इजिप्तनंतर तुर्कीकडूनही कांदा आयात केला आहे. मात्र, या दोन्ही देशांचा कांदा देशात पोहोचायला अजून दोन आठवडे तरी लागतील, त्यामुळं सध्या तरी कांद्याचे भाव कमी होण्याचं चिन्ह दिसत नाहीये.
नवी दिल्ली : कांद्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वैतागले असून सध्या खुल्या बाजारपेठेत कांद्याचा भाव 80 ते 100 रुपये प्रतिकिलो इतका आहे. सरकारी आडक्यानुसार राजधानी दिल्लीत 76 रुपये किलो, तर मुंबईत 82 रुपये किलो कांद्याचा भाव आहे. कांद्याची बाजारपेठेत आवक कमी झाल्याने सध्या कांद्याचे भाव गगणाला भिडले आहेत.
तुर्कीतून आयात करणार कांदा
बाजारपेठेतील कमी झालेली आवक भरुन काढण्यासाठी सरकारने 11000 मेट्रीक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने सरकारी कंपनी एमएमटीसीला यासंबंधीत सुचना दिल्या आहेत. एमएमटीसीने कांदा आयात करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देशात कांदा पोहोचायला 3 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, 20 डिसेंबरपर्यंत कांदा भारतात येईल. ज्यानंतर किरकोळ बाजारातून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल.
इजिप्तलाही दिलीये ऑर्डर
याअगोदर सरकारने इजिप्तकडून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने एमएमटीसीने 6090 मेट्रिक टन कांद्याची ऑर्डर दिली होती. मात्र, मिस्रतून भारतात कांदा यायला अजून 10 दिवस लागणार आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या माहितीनुसार, इजिप्तवरुन येणाऱ्या कांद्याची पहिली खेफ 12 डिसेंबरला भारतात पोहोचेल.
कांद्याचे भाव काही दिवस रडवणार
सध्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. इजिप्तवरुन येणारा कांदा भारतात पोहोचण्यास दोन आठवडे लागतील, त्यामुळं आणखी काही दिवस कांद्याचे भाव असेच राहतील, अशी माहिती ग्राहक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील कांदा डिसेंबर महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात होईल, त्यावेळी काद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. कृषि मंत्रालयाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, जर हवामानाने साथ दिली, तर रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात येईल. दरम्यान, खरीप हंगामातील कांदा नोव्हेंबर महिन्यात बाजारपेठेत येत असतो. मात्र, कांद्याचे प्रमुख उत्पादक राज्य राजस्थान आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अवकाळी पावसामुळं या दोन राज्यात जवळपास 26 लाख टन कांद्याचे उत्पादन घटले आहे. शिवाय रब्बी हंगामातील कांदाही यामुळं धोक्यात आला आहे.
संबंधित बातम्या :-
देवेंद्र फडणवीसांनी दिले पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत
भूमीपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार; राज्यपालांचे आश्वासन
कांदा प्रश्नावरुन आमदार बच्चू कडू आक्रमक | नाशिक | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement