एक्स्प्लोर

मोदी सरकारचा मोठा निर्णय, सैन्यासाठी खरेदी करणार 15 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर; जाणून घ्या किंमत

Light Combat Helicopter: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा कॅबिनेट समितीने (CCS) 15 स्वदेशी लाइट अटॅक हेलिकॉप्टर (LCH) खरेदीला मंजुरी दिली आहे.

Light Combat Helicopter: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा कॅबिनेट समितीने (CCS) 15 स्वदेशी लाइट अटॅक हेलिकॉप्टर (LCH) खरेदीला मंजुरी दिली आहे. एचएएलकडून 3387 कोटींना हे हेलिकॉप्टर खरेदी केले जाणार आहेत. यातील 10 हेलिकॉप्टर हवाई दलासाठी आणि पाच भारतीय लष्करासाठी असतील.

गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर 2021 रोजी राणी लक्ष्मीबाईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचे मॉडेल हवाई दलाला सुपूर्द केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने 17-19 नोव्हेंबर दरम्यान झाशी येथे राष्ट्रीय संरक्षण आत्मसमर्पण पर्व साजरे केले होते. याच अंतर्गत झाशी येथे देशाच्या सशस्त्र दलांचे अनेक वेगवगेळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कारगिल युद्धापासूनच भारताने एलसीएच स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता, कारण त्यावेळी भारताकडे असे अटॅक हेलिकॉप्टर नव्हते. जे 15-16 हजार फूट उंचीवर जाऊन शत्रूचे बंकर नष्ट करू शकतील. मात्र या प्रकल्पाला 2006 मध्ये मान्यता मिळाली. ज्यानंतर गेल्या 15 वर्षांच्या मेहनतीनंतर हे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) तयार करण्यात आले आहे.

याच दरम्यान भारताने नुकतेच अमेरिकेकडून अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर अपाचे विकत घेतले आहे. असे असले तरी कारगिल आणि सियाचीनच्या शिखरांवर अपाचे देखील टेक ऑफ आणि लँडिंग करू शकत नाही. परंतु खूप हलके असल्याने आणि विशेष रोटर्स असल्याने एलसीएच त्याचे ऑपरेशन करू शकते. 

LCH ची वैशिष्ट्ये: 

  • लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर म्हणजेच एलसीएच हेलिकॉप्टरचे वजन सुमारे 6 टन आहे. ज्यामुळे ते खूप हलके आहे. अपाचेचे वजन सुमारे 10 टन आहे. कमी वजनामुळे ते उंचावर असलेल्या भागातही क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते.
  • एलसीएच अटॅक हेलिकॉप्टर 'मिस्ट्रल' एअर टू एअर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि खास फ्रान्समधून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते.
  • एलसीएचमध्ये प्रत्येकी 70 मिमीच्या 12-12 रॉकेटच्या दोन पॉड आहेत.
  • याशिवाय, एलसीएचच्या पुढील भागात 20 एमएम गन बसवण्यात आली आहे. जी 110 डिग्रीमध्ये कोणत्याही दिशेने फिरू शकते.
  • कॉकपिटची सर्व फीचर्स पायलटच्या हेल्मेटवर प्रदर्शित केली जातात. 

शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसणार नाही 

एचएएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एलसीएचमध्ये असे स्टेल्थ फीचर्स आहेत की ते शत्रूच्या रडारला सहज पकडू शकणार नाहीत. जर शत्रूचे हेलिकॉप्टर किंवा फायटर जेट त्याचे क्षेपणास्त्र एलसीएचवर लॉक केले, तर ते त्याला चुकवू शकते. याची बॉडीcबख्तरबंद आहे, जेणेकरून यावर गोळीबाराचा विशेष परिणाम होणार नाही. बुलेटचा देखील रोटर्सवर कोणताही परिणाम होणार नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget