रेल्वे मंत्रालयाचा जिगरबाज Mayur Shelke यांना सलाम, 50 हजारांचं बक्षीस जाहीर!
पॉईंटमन मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. आता रेल्वे मंत्रालयाने देखील त्यांच्या या धाडसाची दखल घेत, त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
मुंबई : सुपरनॅचरल पॉवर्स असलेले सिनेमातील अनेक सुपरहिरो आपल्याला भुरळ पाडत असतात. परंतु आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे सर्वसामान्य असूनही सुपरहिरोपेक्षा कमी नसतात. असाच एक सुपरहिरो म्हणजे पॉईंटमन मयुर शेळके. एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगाने येत असतानाही, मयुर शेळके यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता रेल्वे मंत्रालयाने देखील त्यांच्या या धाडसाची दखल घेत, त्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
Hon'ble Minister Shri @PiyushGoyal announced an award of Rs 50000/- to Shri Mayur Shelke, Pointsman, Vangani Station for the act of bravery, courage & presence of mind on duty.
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 20, 2021
He saved a life of a child who accidentally fell on the track.
Congratulations to Shri M. Shelke pic.twitter.com/KOD78oZH9R
मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षांचा एक मुलगा आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालता चालता तोल जाऊन तो मुलगा ट्रॅकवर पडला. मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रॅकवर पडला नेमक्या त्याचवेळी उदयन एक्स्प्रेस येत होती. त्या मुलाची अंध आई आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बावरलेल्या आईला मुलगा नेमका कुठे पडला हेच कळत नव्हतं. ट्रेन जवळ येत असल्याचं पाहून मुलगा कसाबसा उठून प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता. परंतु प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने त्याला काही चढता येत नव्हतं. ही बाब तिथे असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके यांनी पाहिली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली. एक्स्प्रेस काही सेकंदाच्या अंतरावर असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते मुलापर्यंत पोहोचले. त्यांनी मुलाला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवलं आणि स्वतःही वायुवेगाने प्लॅटफॉर्मवर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा थरार तिथल्या प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एक्स्प्रेस समोर होती, पण जिवाची पर्वा न करता रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला....
ते थरारक सात सेंकद! जिगरबाज पॉईंटमन मयुर शेळके म्हणाला, काही क्षण भीती वाटली, मात्र...
मयुर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर कदाचित त्या अंध आईने आपल्या मुलाला गमावलं असतं. परंतु मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयुर शेळकेने वाचवलं.
रेल्वे मंत्रालयाने या संबंधित घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करुन लिहिलं आहे आहे. "परोपकारी: मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर पॉईंटमन मयुर शेळके यांनी चिमुकल्याचे प्राण वाचवले. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. आम्ही त्यांच्या धाडसाला आणि कर्तव्यदक्षतेला सलाम करतो."
A Good Samaritan:
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 19, 2021
At Vangani station of Central Railway, Pointsman Mr. Mayur Shelkhe saved the life of a child just in the nick of the time. He risked his life to save the life of the child.
We salute his exemplary courage & utmost devotion to the duty. pic.twitter.com/V6QrxFIIY0
तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही ट्विटरवर मयुर शेळके यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या कामगिरी मोल बक्षीस किंवा पैशांमध्ये करता येणार नाही. पण कर्तव्यावर असताना आपल्या कार्याद्वारे मानवतेला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल," असं गोयल यांनी म्हटलं आहे.
परिस्थितियां जो भी हों, हमारे रेलकर्मी अपना दायित्व निभाने में हमेशा आगे रहे हैं।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 20, 2021
इसका उदाहरण पेश करते हुए मुंबई के वांगणी स्टेशन पर रेलवेमैन मयूर शिल्के ने एक बालक को ट्रेन की चपेट में आने से बचाया।
रेल परिवार को उन पर गर्व है। उनकी इस बहादुरी के लिये उन्हें पुरस्कृत किया गया। pic.twitter.com/Ky5jPF8Sn7