एक्स्प्लोर

Sanjay Raut on Asia Cup Trophy Ind vs Pak Final: 15 दिवसांपूर्वी मोहसीन नक्वीसोबत फोटो काढून हात मिळवलात, आता देशाला कशाला मूर्ख बनवताय? संजय राऊत टीम इंडियावर भडकले

Sanjay Raut on Asia Cup Trophy Ind vs Pak Final: पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिल्याचे पाहायला मिळाले.

Show Quick Read
Key points generated by AI, verified by newsroom

Sanjay Raut on Asia Cup Trophy Ind vs Pak Final: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिल्याचे पाहायला मिळाले. आता या सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीम इंडियावर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की, ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर एकत्र खेळत आहात, ज्याला देशाचा विरोध आहे. पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही. काल अनेक ठिकाणी सामना दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. भारतीय खेळाडूंनी आधी काहीतरी हस्तांदोलन केले नाही. अरे पण तुम्ही खेळलात ना.

तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? (Sanjay Raut on Team India)

काल तुम्ही जिंकले असे आम्हाला कळले. आम्ही काही ते बघत नाही. मोहसीन नक्वी ज्या कौन्सिलवर आहेत त्या कौन्सिलवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पुढारी देखील आहेत. काल तुम्ही त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. पण तुम्ही खेळलात ना. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वीसोबत याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केलं. मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? (Sanjay Raut on Team India)

संजय राऊत पुढे म्हणाले की, मैदानावर स्वरूप वेगळं आहे आणि आतलं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? हे आता लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तुम्ही सामना खेळलाच का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला.

भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम (Sanjay Raut on Jay Shah)

जय शाह आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डवर महाराष्ट्रातील खेळाडू दिसत नाहीत. हे ठरवून सुरू आहे का? हा प्रश्न मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे की असे का होत आहे? अनेक भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

आणखी वाचा 

Asia Cup Trophy Ind vs Pak Final: टीम इंडियाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही?; अखेर खरं कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget