असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील गोळीबार प्रकरणात नवा गौप्यस्फोट; आरोपींनी दिली 'ही' माहिती
Firing On Asaduddin Owaisi : खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील आरोपींनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Firing On Asaduddin Owaisi : एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. ओवेसी यांच्या हत्येच्या हेतूनेच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ओवेसी गोळीबार प्रकरणातील आरोपी सचिन शर्मा आणि शुभम हे कट्टरतावादी विचारांचे असल्याचे समोर आले आहे. ओवेसी यांच्या भाषणावर नाराज असल्याने गोळीबार करण्यात
गुरुवारी हापूड जवळील छिजारसी टोल नाक्याजवळ असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर दोघांनी गोळीबार केला. मुख्य आरोपी सचिन शर्माकडून एक 9 एमएम पिस्तूल जप्त करण्यात आले. तर सहआरोपी शुभमकडून 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. या दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत या हल्ल्यामागे अन्य कोणाचीही भूमिका नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्य आरोपी सचिन शर्माने याचा संपूर्ण योजना आखली आणि मित्र शुभम याला सोबत घेतले.
याआधीही केला होता हल्ल्याचा प्रयत्न
एका वृत्तसंकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सचिन शर्माने याआधीदेखील तीन ते चार वेळेस ओवेसी यांच्यावर हल्ल्याचा कट आखला होता. सप्टेंबर महिन्यात संभलमध्ये झालेल्या एका रॅलीच्या दरम्यान आरोपी सचिन हा ओवेसी यांच्या जवळ पोहचला होता. त्याने पिस्तूल काढण्याआधी ओवेसी यांच्यासोबत सेल्फी घेऊ इच्छिणाऱ्या गर्दीने त्याला मागे ढकलले.
गुरुवारीदेखील सचिनने ओवेसी यांच्यावर पहिल्यांदा गोळी चालवली. ओवेसी यांच्या कारच्या खालील बाजूस मुद्दामून अधिक गोळ्या चालवल्या. आरोपी सचिननुसार हल्ला होताच व्यक्ती खाली वाकते अथवा बसते. अशा वेळेस कारच्या खालील बाजूस गोळी झाडल्यास ओवेसी यांना जरूर गोळी लागू शकते. त्यानुसार, सचिनने तीन गोळ्या झाडल्या.
आरोपीकडे 9 एमएम पिस्तुल आले कसे?
आरोपींना शस्त्र कशी मिळवली याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. 9 एमएमच्या पिस्तूलवर बंदी आहे. 9 एमएम पिस्तुलची काडतुसे ही फक्त पोलिसांना मिळतात. त्यामुळे हे पिस्तुल आणि काडतूस कशी मिळवली याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.