दुध महागलं! 'या' राज्यात दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, 50 मिली अतिरीक्त दुधही मिळणार
कर्नाटकमध्ये दुधाच्या दरात (Karnataka Milk Price) वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात (Nandini milk Price) लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.
Milk Rate Hike: कर्नाटकमध्ये दुधाच्या दरात (Karnataka Milk Price) वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महासंघाने नंदिनी दुधाच्या दरात (Nandini milk Price) लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, दरात वाढ जरी केली असली तरी प्रत्येक पॅकेटमध्ये 50 मिली अतिरिक्त दुध मिळणार आहे. या वाढीनंतर 1050 मिलीसाठी दुधाची किंमत प्रति लिटर 44 रुपये होईल. जे नंदिनी मिल्कच्या सर्व दुधाच्या प्रकारांमध्ये सर्वात स्वस्त आहे.
वर्षभरात दुधाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ
उद्यापासून (26 जूनपासून) नंदिनी दुधाच्या पॅकेटच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या सुधारित किमतीसह, कर्नाटक दूध महासंघाने (KMF) प्रत्येक पॅकेटमध्ये 50 मिमी अतिरिक्त दूध देण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे, एक लिटर दुधाच्या पाकिटात 1050 मिली दूध आणि अर्ध्या लिटर दुधाच्या पाकिटात 550 मिली दूध मिळणार आहे. एका वर्षाच्या आत कर्नाटकातील दुधाची ही दुसरी दरवाढ आहे. गेल्या वर्षी जुलै 2023 मध्ये कर्नाटक मिल्क फेडरेशनने (KMF) दुधाच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली होती.
दुध व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल
कर्नाटकमध्ये स्थानिक दूध आणि डेअरी ब्रँड नंदिनी खूप लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदिनी मिल्क हा देखील निवडणुकीतील एक मुद्दा होता. याचे कारण नंदिनी आणि अमूल यांच्यातील संघर्ष होता. खरं तर, जेव्हापासून अमूलने कर्नाटकातील ई-कॉमर्स मार्केटद्वारे डेअरी उत्पादने ऑनलाइन विकण्याची घोषणा केली, तेव्हापासून स्थानिक हितसंबंधांवर परिणाम होत असल्याचे कारण देत राज्यात वाद सुरू झाला. नंदिनी दुधाच्या विक्रीच्या माध्यमातूम कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे.
अमूल परागसह मदर डेअरीनं दुधाच्या दरात केली वाढ
एका बाजूला दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Milk Farmers) दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजुला विविध दुध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच अमूल (Amul) आणि मदर (Madar) डेअरीसह आता परागने दुधाच्या दरात (Parag Milk Price) वाढ केली आहे. परागने दुधाच्या दरात प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळं पगार दुधाची किंमत आता प्रतिलिटर 66 रुपयांवरुन 68 रुपयांवर गेली आहे. महागाईचा परिणाम आता दुधावरही दिसून येत आहे. आधी अमूल, मग मदर डेअरी, आता परागचे दुधही महाग झाले आहे. परागच्या दोन्ही एक लिटर व्हरायटी पॅकमध्ये प्रत्येकी 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पराग गोल्ड 1 लीटरची किंमत 66 रुपयांवरून 68 रुपये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पराग दुधाचे नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत.