एक्स्प्लोर

CyberSafe | 18 राज्यात आनलाईन फ्रॉड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सायबरसेफची कामगिरी

देशात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. फोनच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.यावर आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एफकॉर्ड (FCord) संचलित सायबर सेफ अ‍ॅप काम करत आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाचा सायबर सेफ देशात डिजिटल पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश करण्यासाठी व्यापकपणे काम करत आहे. एकीकडे डिजिटल फसवणूक उघडकीस येत असताना, दुसरीकडे डिजिटल पेमेंटस सुरक्षित केले जात आहेत. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, यामुळे देशातील 18 राज्यांमध्ये फसवणुकीच्या टोळ्या उघडकीस आल्या आहेत.

यापूर्वी 11 जून रोजी उदयपूर येथे राहणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक झाली होती. झारखंडमध्ये बसून या गुन्हेगाराने हा फ्रॉड केला होता. गृहमंत्रालयाच्या एफकॉर्ड (FCord) संचलित सायबर सेफ अ‍ॅपने सांगितले की, हे पैसे एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये जमा झाले आहे. या कार्ड्सच्या मदतीने फ्लिपकार्ट वरून चिनी बनावटीच्या शिओमी, पोको एम 3 हे मोबाइल फोन खरेदी करण्यात आले.

मध्य प्रदेशातील बालाघाटच्या पत्त्यावर हे फोन आले होते. याची माहिती मिळताच बालाघाटचे एसपींना कळवण्यात आले. यानंतर मध्य प्रदेशच्या पोलिसांनी मास्टरमाईंडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 33 नवीन फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. फोनवरुन फसवणूक करणार्‍या टोळीने प्रत्येक फोन 10,000 रुपयांना खरेदी केला होता, हे फोन ही टोळी 5-10 टक्के सूट देऊन काळ्या बाजारात विकणार होते. झारखंड पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या टोळीतील शेकडो ऑपरेटिव्ह वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करत आहेत. यात ओटीपी मागवून फसवणूक, काही ई-कॉमर्स फ्रॉड आणि काही क्रेडिट कार्ड फ्रॉड अशा वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवत आहेत. आतापर्यंत 8 फ्रॉड-टू-फोन मास्टरमाइंड लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात 2 मध्य प्रदेशातील, 4 झारखंड आणि 2 आंध्र प्रदेशातील आहेत. आणि फसवणूक झालेल्या पैशातून खरेदी केलेले सुमारे 300 नवीन फोन जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईत या टोळीचे सुमारे 900 सेल फोन आणि 1000 बँक खाती आणि शेकडो यूपीआय आणि ई-कॉमर्स आयडी समोर आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यातील सुमारे 100 बँक खाती आणि डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रिज करण्यात आले आहेत. फोन टोळीशी संबंधित फसवणुकीविरोधात हे ऑपरेशन 18 राज्यात कार्यरत आहे. यात 350 लोक काम करत असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu : '३० जून २०२६ च्या आत कर्जमुक्ती होणारच', बच्चू Kadu यांची ग्वाही; आंदोलन तूर्तास स्थगित
Ind Beat Aus Womens World Cup : भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलिया हरवत विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक
Abu Azmi : वंदे मातरम् वरून पुन्हा वाद, अबू आझमींच्या विधानाने राजकारण तापलं Special Report
Powai Hostage Crisis: पवईत थरार, स्टुडिओत १७ मुलांना ओलीस; आरोपीचा एन्काऊंटर Special Report
MVA Morcha Meeting : मोर्चासाठी एकी, बैठकीत बेकी? विरोधकांचं प्लॅनिंग Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
अजित पवार अध्यक्षपदासाठी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा; 3 बिनविरोध
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
रोहित आर्य म्हणाला शिक्षण विभागाने 2 कोटी थकवले; शिक्षणमंत्र्यांचं स्पष्टीकरण, दादा भुसेंनी सांगितलं
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
CBSE दहावी अन् बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडे 110 दिवस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
Rohit Arya Encounter: चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
चिमुरड्यांना ओलिस ठेवून जीवाशी खेळ, पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारेंच्या गोळीत रोहित आर्याचा एन्काऊंटर
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
सकाळी ऑडिशन, मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा, कोल्ड्रिंक्स मागवलं ; अखेर रोहित आर्यने बंदूक ठेवत खरे रंग दाखवले
Embed widget