अॅमेझॉन 'आत्मनिर्भर भारत'चा भाग बनणार, चेन्नई इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीला करणार आरंभ
अॅमेझॉनने 2025 पर्यंत भारतातील 10 दशलक्ष लघू आणि मध्यम व्यवसायांच्या डिजिटायझेशनसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 10 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवलं आहे.
![अॅमेझॉन 'आत्मनिर्भर भारत'चा भाग बनणार, चेन्नई इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीला करणार आरंभ amazon become part indias aatmnirbhar bharat company will set up fire stick device manufacturing unit in chennai अॅमेझॉन 'आत्मनिर्भर भारत'चा भाग बनणार, चेन्नई इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीला करणार आरंभ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/29133633/amazon-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशातील आणि जगातील मोठमोठ्या कंपन्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेमध्ये सामील होत आहेत. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) देखील त्याचा एक भाग बनली आहे. वर्षाच्या अखेरीस अॅमेझॉन चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. कंपनी या युनिटमध्ये फायर टीव्ही स्टिकसह इतर साधनांची निर्मिती करणार आहे. याशिवाय 2025 पर्यंत अॅमेझॉनने भारतातील 10 दशलक्ष लघू आणि मध्यम व्यवसायांच्या डिजिटायझेशनसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 10 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवलं आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि अॅमेझॉन इंडियाचे सीनिअर वाईस प्रेसिडंट अमित अग्रवाल यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
भारत हा गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक आहेच पण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पुरवठा साखळीत मुख्य भूमिका बजावण्यासाठीही आता सज्ज आहे,असं रवीशंकर प्रसाद म्हणाले. आपल्या सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव (PLI) योजनेच्या निर्णयाला जागतिक पातळीवरही भरपूर प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. चेन्नईत उत्पादन युनिट सुरू करण्याच्या अमेझॉनच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, यामुळे, स्वदेशी उत्पादनाच्या क्षमता वाढतील व रोजगार निर्माण होतील, असंही ते म्हणाले.
इलॉन मस्क यांना मागे टाकत जेफ बेझोस पून्हा सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी टॉप टेनमधून बाहेरHeld a very good conversation with @AmitAgarwal and @Chetankrishna of @amazonIN today. Delighted to share that soon Amazon will commence manufacturing of electronics products like FireTV stick in India. pic.twitter.com/BRpnUG6fA5
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) February 16, 2021
डिजीटली सामर्थ्यवान आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाचा हा पुढील टप्पा असेल. भारतात भारतासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने उत्पादित करणे व ती भारताबाहेरही निर्यात करणे या अमेझॉनच्या प्रयत्नांचा हा आरंभ असेल असं रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं.
Amazon | अॅमेझॉनचे जेफ बेझोस CEO पदावरुन पायउतार, अॅन्डी जेसींकडे धुरा
चेन्नईच्या फॉक्सकॉनची उपकंपनी असलेली क्लाउड नेटवर्क टेक्नॉलॉजी ही या उत्पादनासाठी अमेझॉनची कंत्राटदार उत्पादन कंपनी असेल आणि या वर्षाअखेरपर्यंत उत्पादनाला सुरूवात होईल. भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उत्पादने ई-कॉमर्सच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत नेण्यास अमेझॉन इंडियाने सहाय्य करावे, अस रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. अमेझॉन जागतिक कंपनी असली तरी अमेझॉन इंडियाने भारतीय व्यवसाय क्षेत्राशी व संस्कृतीशी नाते जोडणारी भारतीय कंपनी म्हणून भरारी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ईडीचा अॅमेझॉनविरोधात तपास सुरु, FEMA च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)