Bloomberg Billionaire Index: इलॉन मस्क यांना मागे टाकत जेफ बेझोस पून्हा सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी टॉप टेनमधून बाहेर
टेस्लाच्या इलॉन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकत अॅमेझॉनचे (amazon) जेफ बेझोस (Jeff Bezos) पुन्हा एकदा जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest) बनले आहेत. मुकेश अंबानी अब्जाधीशांच्या टॉप टेनमधून बाहेर पडले आहेत.

Bloomberg Billionaire Index: अॅमझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पुन्हा एकदा जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने ही यादी जाहीर केली असून या यादीत भारताचे मुकेश अबांनी हे अकराव्या स्थानी आहेत.
जेफ बेझोस यांची संपत्ती आता 19,100 कोटी डॉलर्स म्हणजे 14.10 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने इलॉन मस्क हे दुसऱ्या क्रमांकावर पोहचले असून त्यांची संपत्ती ही 19,000 कोटी डॉलर्स इतकी आहे.
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार मंगळवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये 2.4 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली असून ती 796.22 डॉलरवर पोहचली. त्यामुळे इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 458 कोटी डॉलरची घसरण झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा परिणाम म्हणून अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे पहिले स्थान घसरले असून ते आता दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत.
Amazon | अॅमेझॉनचे जेफ बेझोस CEO पदावरुन पायउतार, अॅन्डी जेसींकडे धुरा
या वर्षी इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 2050 कोटी डॉलरची भर पडली आहे. तर जेफ बेझोस यांची संपत्ती केवळ 88.40 कोटी डॉलरची भर पडली आहे.
मुकेश अंबानी टॉप टेनच्या बाहेर रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी आता अब्जाधीशांच्या यादीत टॉप टेनमधून बाहेर पडले आहेत. ते आता अकराव्या स्थानी पोहचले आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 7970 कोटी डॉलर रुपये म्हणजे जवळपास सहा लाख कोटी रुपये इतकी आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 303 कोटी डॉलरची भर पडली आहे. गेल्या वर्षी रिलायन्सच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीतही वाढ झाली होती आणि ते अब्जाधीशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचले होते.
टॉप टेन अब्जाधीश जेफ बेझोस: 19100 कोटी डॉलर इलॉन मस्क: 19000 कोटी डॉलर बिल गेट्स: 13700 कोटी डॉलर बनॉर्ड अरनॉल्ट: 11600 कोटी डॉलर मार्क झुकरबर्ग: 10400 कोटी डॉलर झांग शानशन: 9740 कोटी डॉलर लॅरी पेज: 9740 कोटी डॉलर सर्जेई बिन: 9420 कोटी डॉलर वॉरेन बफे: 9320 कोटी डॉलर स्टीव्ह बाल्मर: 8760 कोटी डॉलर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
