एक्स्प्लोर
Advertisement
प्रकृती अस्वास्थ्यामुळे केंद्रीय मंत्री मनेका गांधी रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मनेका गांधी पिलिभीत दौऱ्यावर असताना, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं आहे.
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी आज पीलीभीत येथे आरोग्य योजना आणि लसीकरण कार्यक्रमाच्या पाहणीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे मनेका गांधी यांना तातडीने स्थानिक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं.
त्यांच्यावर प्रथमिक उपचार करुन दिल्लीतील मेदांता रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांनी मनेका गांधी यांना श्वास घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केलं पित्ताशयातील खड्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement