एक्स्प्लोर
VIDEO : डान्सला नकार दिल्याने गर्भवती नर्तिकेची स्टेजवरच हत्या

पंजाब : सोबत डान्स करण्यास नकार दिल्याने एका गर्भवती नर्तिकेची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबच्या बठिंडा शहरात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. स्टेजवर डान्स करत असतानाच गोळी झाडून तिला ठार मारण्यात आलं.
लग्नसोहळ्यात डान्ससाठी बोलावलेल्या ट्रुपमध्ये कुलविंदर ही 22 वर्षीय तरुणी नृत्य करत होती. त्यावेळी सोबत डान्स करण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर गोळी झाडली. छातीत गोळी घुसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. कलम 302 अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे..
पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























