एक्स्प्लोर

वाजपेयी असते, तर भाजपला राजधर्माची आठवण करुन दिली असती : ममता बॅनर्जी

CAA आणि NRC विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन केले. यावेळी भाजपला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाक्याची आठवण करुन दिली.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा सीएए आणि एनआरसीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असते, तर राजधर्माची आठवण त्यांनी करुन दिली असती, असंही त्या म्हणाल्या. देशातल्या 38 टक्के जनतेने मोदी सरकारला मतदान केलंय. म्हणजे 62 टक्के जनतेनं त्यांना नाकारल्याचंही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा रॅली काढून आपला विरोध दर्शवला. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर मतदान घ्यावे, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्य़मंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. विद्यमान भाजप सरकारचा यात पराभव झाला तर त्यांनी सत्ता सोडवी, असंही त्या म्हणाल्या. भाजप सीएएला होणाऱ्या विरोधाला हिंदू-मुस्लीम धार्मिक रंग देत असल्याचा आरोपही ममता यांनी यावेळी केला. सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात निघालेल्या मोर्चाला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मुख्य़मंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या? "भाजपला बहुमत मिळाले, याचा अर्थ असा नाही की त्यांना हवं ते करतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सीएए आणि एनआरसी हे दोन्ही कायद्यावर संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली मतदान घ्यावे". जर यात भाजप अपयशी झाले तर त्यांनी सत्ता सोडवी लागणार, असल्याचंही त्या म्हणाल्या. भाजप आपल्या समर्थकांना आंदोलनामध्ये घुसवून दंगा करणार असल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप, ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हे दोन्हीही कायदे कोणत्याही परिस्थितीत राज्यात लागू करणार नसल्याचा पुनरउच्चारही ममता यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात लोक रस्त्यावर - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काल (गुरुवारी)डाव्या संघटनांनी देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. याची तीव्रत सर्वता अधिक उत्तर भारतात पाहायला मिळाली. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि कर्नाटकात हिंसाचार, जाळपोळ झाली. लखौनत पोलिसांवर गोळीबार केल्याचीही घटना घडली. यादरम्यान, एकाचा मृत्यू झाला. वाराणसीतही तुफान दगडफेक झाली. दिल्लीच्या बहुतांश भागांत इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती. हेही वाचा - एमआयएम ही भाजपची बी टीम; ममता बॅनर्जींचा ओवेसींवर हल्लाबोल VIDEO | पश्चिम बंगालमध्ये आरएसएस कार्यकर्त्यासह कुटुंबातील तिघांची हत्या, भाजपची ममता सरकारवर टीका | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget