एक्स्प्लोर
Advertisement
एमआयएम ही भाजपची बी टीम; ममता बॅनर्जींचा ओवेसींवर हल्लाबोल
असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम पार्टी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षावर आणि या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, ओवेसींची एमआयएम पार्टी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या.
बॅनर्जी म्हणाल्या की, मी पाहतेय की, अल्पसंख्यांकांमध्ये अनेक कट्टरपंथी आहेत. हे कट्टरपंथी हैदराबादमध्ये आहेत. हे लोक भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत. बॅनर्जी यांनी भाजपशी मुकाबला करण्यासाठी त्यांच्या रणनितीत बदल केला आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अल्पसंख्याक कट्टरतेबाबत भाष्य केले आहे.
कूचबिहारमध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या कार्यकार्त्यांशी चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्या म्हणाल्या की अल्पसंख्यांकांमधील कट्टरपंथी हैदराबादमध्ये आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे लोक भाजपची बी टीम म्हणून काम करत आहेत.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांना ओवेसी यांनीदेखील सडेतोड उत्तर दिले आहे. ओवेसी म्हणाले की, देशभरात आम्ही केवळ तीन जागांवर निवडणूक लढलो होतो. परंतु भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत. आम्ही जर त्यांची बी टीम आहोत, तर मग भाजपने इतक्या जागा कशा जिंकल्या?
हरियाणात तर आम्ही निवडणूक लढलोच नाही, मग तिथे भाजपव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पक्षाचं सरकार का नाही आलं? असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात काय सुरु आहे, हे तर आपण पाहतोच आहोत. त्यामुळे आता लोकांनी आम्हाला भाजपची बी टीम म्हणू नये, आम्ही तर आता ए टीम आहोत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement