Mamata Banerjee: ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेणार
West Bengal : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार असून जीएसटी संबंधी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शुक्रवारपासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून त्या उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालसंबंधीत जीएसटी आणि विविध विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन सुरू असल्याने ममता बॅनर्जी या पक्षाच्या खासदारांशीही चर्चा करणार आहेत. तसेच बंगालमधील नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या सात जिल्ह्यांच्या नावासंबंधीही त्या चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
नीती आयोगाच्या बैठकीत भाग घेणार
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 7 तारखेला होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. गेल्या वेळच्या बैठकीला त्यांनी दांडी मारली होती. यावेळी त्या उपस्थित राहणार आहेत. या वेळच्या बैठकीमध्ये त्या केंद्राकडून थकित असलेल्या जीएसटीच्या रक्कमेसंबंधी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तसेच केंद्र आणि राज्यातील ताणलेल्या संबंधावरही सरकारला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता
ममता बॅनर्जी या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनी लॉंड्रिग प्रकरणात ईडीकडून सोनिया गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसमधील मंत्री असलेल्या पार्थ चटर्जी यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जी यांनी चटर्जी यांना मंत्रिपदावरून हटवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, सूत्रांची माहिती
- Grampanchayat Election : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये संध्याकाळपर्यंत 78 टक्के मतदान, उद्या होणार फैसला
- Sujata Patil : वादग्रस्त महिला पोलिस अधिकारी सुजाता पाटील पुन्हा सेवेत, मविआच्या काळात लाचप्रकरणी झालं होतं निलंबन