मतदार फसवणूक प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती देता देता का बंद केली, निवडणूक आयोग भाजपचं बॅक ऑफिस झालं आहे का? मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
खरगे यांनी मे 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, आलंद विधानसभा मतदारसंघात यंत्रणांनी 5994 बनावट अर्ज पकडले होते, जे मोठ्या प्रमाणात मतदारांना काढून टाकण्याच्या प्रयत्नाचा पुरावा होते, असे म्हटले आहे.

Mallikarjun Kharge on Election Commission: निवडणूक आयोग (EC) आता भाजपचे बॅक ऑफिस बनले आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने आता मतदार फसवणूक प्रकरणाशी संबंधित माहिती देणे बंद केले आहे. खरगे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मे 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली होती. याची चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सुरुवातीला काही कागदपत्रे दिली होती, परंतु आता ते महत्त्वाचे पुरावे देण्यास नकार देत आहे, जेणेकरून खऱ्या गुन्हेगारांना वाचवता येईल. दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप खरगे यांच्या आरोपांना उत्तर दिलेले नाही
Is the Election Commission of India (ECI) now BJP’s Back-Office for #VoteChori?
— Mallikarjun Kharge (@kharge) September 7, 2025
🗳️Understand the chronology
🔹Ahead of the May 2023 Karnataka elections, Congress had exposed massive deletion of voters: in Aland Constituency
🔹Thousands of voters were stripped of their rights… pic.twitter.com/HZ5Qs1XFfs
भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने माहिती थांबवली
खरगे यांनी X वर लिहिले की, मे 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, आलंद विधानसभा मतदारसंघातील तपास यंत्रणांनी 5994 बनावट अर्ज पकडले होते, जे मोठ्या प्रमाणात मतदारांना काढून टाकण्याच्या प्रयत्नाचा पुरावा होते. काँग्रेस सरकारने याची सीआयडी चौकशीचे आदेश दिले. चौकशीच्या सुरुवातीला ईडीने पुरावे दिले, परंतु आता ते भाजपच्या दबावाखाली माहिती शेअर करत नाही.
निवडणूक आयोगाने भाजपसोबत निवडणूक चोरली
दरम्यान, राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी मतदारयादीतील अनियमिततेवर 1 तास 11 मिनिटे 22 पानांचे सादरीकरण केले होते. राहुल गांधी यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि मतदार यादीत संशयास्पद मतदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर आमच्या संशयाची पुष्टी झाली की निवडणूक चोरी झाली आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न दिल्याने, आम्हाला खात्री पटली की निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्र निवडणूक चोरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























