(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahashivratri 2024 LIVE Updates : सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक कुणकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले
Mahashivratri 2024 LIVE Updates : आज महाशिवरात्री! राज्यासह देशभरात महादेवाच्या नावाचा जयघोष सुरू आहे. या निमित्त दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स जाणून घ्या
LIVE
Background
Mahashivratri 2024 LIVE Updates : आज महाशिवरात्री! हिंदू धर्मियांसाठी हा एक महत्वाचा सण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करून विधिवत पूजा करतात. अनेक ठिकाणी विधीवत पूजा करण्यात येतेय, तर काही ठिकाणी दर्शनाच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. महाशिवरात्रीमिमित्त दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या
Sindhudurg : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक कुणकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले
Sindhudurg : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक कुणकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले. दरवर्षी नारायण राणे कुणकेश्वर मंदिरात सहकुटुंब दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेतल्यानंतर कुणकेश्वर चरणी महाराष्ट्र सुजलाम होउदे, देशातील जनता सुखी समाधानी राहूदे आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 400 पार खासदार निवडून येउदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होऊदेत असे साकडे कुणकेश्वर चरणी साकडं घातल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत नीलम राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते.
Vardha : सेलूच्या महाशिवरात्रीच्या दिंडी सोहळ्याने वेधले लक्ष, मोठ्यांसह चिमुकल्यांचा सहभाग
Shirdi : महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी प्रसादालयात महाप्रसाद, साडे पाच हजार किलो साबुदाण्याचा होणार वापर.
Shirdi : महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी याचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. माध्यान्ह आरती नंतर साईबाबांना खिचडीचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणार असून आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आलीय.. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो.. आज खिचडी सोबतच शेंगदाणा आमटी सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येतय... महाशिवरात्र निमित्त येणाऱ्या साई भक्तांना असणारा उपवास लक्षात घेता साई संस्थान कडून ही जय्यत तयारी करण्यात आली असून आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे..
Nagpur : आंभोरा येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी, पाच नदींच्या संगमावर निसर्ग सानिध्यात मंदिर
Nagpur : भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा येथील वैनगंगा नदीसह पाच नद्यांच्या संगमावरील अंभोरा येथील टेकडीवर प्रभू शिवाचं मंदिर आहे. चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात आंभोरा येथील शिवमंदिरातील महाशिवरात्रीनिमित्त शंकर महादेवाचं दर्शन घेऊन दूरवरचा नयनरम्य परिसर न्याहाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची इथं गर्दी बघायला मिळतं आहे