(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Vaccine Dry Run LIVE Updates : महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन
Maharashtra Dry Run of COVID-19 Vaccine in India : कोरोना व्हायरसवरील लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज (शुक्रवारी) देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.
LIVE
Background
Corona Vaccine Dry Run : भारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे. यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. (India Corona Vaccine Dry Run) लसीकरणाच्या ड्राय रनचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता देशात दुसऱ्या टप्प्यातील ड्राय रन पार पडणार आहे. उत्तर प्रदेश आणि हरयाणाला वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे ड्राय रन आयोजित करण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत देशातील जवळपास 700 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडताना दिसणार आहे.
2 जानेवारीला पार पडला होता पहिला टप्पा
यापूर्वी 2 जानेवारी 2021ला कोरोना लसीच्या ड्राय रनचा पहिला टप्पा पार पडला होता. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीबाबतची जागरुकता आणि प्रशिक्षण देण्यासाठी, सोबतच अधिकाऱ्यांची कार्यक्षमता आणि तत्परता पडताळण्यासाठी हे ड्राय रन पार पडलं. याअंतर्गत 125 जिल्ह्यांमध्ये 285 ठिकाणांवर ही प्रक्रिया पार पडली.
केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या माहितीनुसार 2 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या ड्राय रन प्रमाणंच तीन प्रकारच्या स्थळांची पाहणी करण्यात येईल. ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य संस्था (जिल्हा रुग्णालय/ वैद्यकिय महाविद्यालय), खासगी आरोग्य संस्था आणि ग्रामीण अथवा नागरी संस्थांचा समावेश असेल.
कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राजेश टोपेंची मागणी
कोरोना लसीसाठी घेण्यात येणाऱ्या या रंगीत तालमीमध्ये कोविड 19 रोलआऊटच्या सर्व पैलू उदाहरणार्थ राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि रुग्णालय स्तरांवरील अधिकाऱ्यांची ओळख पटवून दिली जाईल. कोविड 19चं लसीकरण सुरु करण्यासाठी वॉक-इन-फ्रीजर, वॉक-इन-कूलर, आइस-लाइंड रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजरसोबतच सिरिंज आणि इतर संसाधनांच्या पुरेशा साठ्याबाबचीही निश्चिती करण्यात येईल.