कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राजेश टोपेंची मागणी
लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
![कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राजेश टोपेंची मागणी Corona vaccination should be paid by central government, Rajesh Tope demanded कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राजेश टोपेंची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/10222826/rajesh-tope.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. कोरोना लसीकरणासाठी लागणार खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
उद्या 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 'ड्राय रन'
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या (शुक्रवार 8 जानेवारी) 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्थेकडून ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, यावूर्वीच (2 जानेवारी) पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यात तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहिम राबविण्यात आली आहे.
ड्राय रनचा उद्देश..
- क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे.
- कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी.
- प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे.
- लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन घेतला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)