एक्स्प्लोर
फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री
देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार 'असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती आहे.
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस हे देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर तब्बल 22 गुन्हे दाखल असून त्यापैकी तीन गंभीर स्वरुपाचे आहेत. देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार 'असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन गुन्हेगारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याविरोधात 11 गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांच्यावर तीन खटले दाखल आहेत.
या अहवालात मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत.
चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 177 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ठरलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याकडे 129 कोटी, तर तिसऱ्या क्रमांकावरील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे 48 कोटींची संपत्ती आहे.
सर्वात गरीब सीएम माणिक सरकार यांची एकूण संपत्ती अवघी 26 लाखांची आहे. त्यांच्याकडे स्वतःची गाडी किंवा घरही नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे 30 लाखांची संपत्ती आहे. त्यात कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. तिसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती असून, मुफ्तींकडे एकूण 55 लाखांची संपत्ती आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सिक्कीमचे मुख्यमंत्री पी. के. चामलिंग हे आघाडीवर आहेत. चामलिंग यांच्याकडे पीएचडी आहे. देशातील 39 टक्के मुख्यमंत्री पदवीधर असून 32 टक्के मुख्यमंत्र्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. 16 टक्के मुख्यमंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 10 टक्के मुख्यमंत्र्यांनी माध्यमिक शिक्षणही पूर्ण केलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement