एक्स्प्लोर
Advertisement
मध्य प्रदेशच्या 'त्या' पोलिस अधिकाऱ्याकडून शोभा डेंचे आभार
मुंबई : लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवर मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्याच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवल्यानंतर डे यांच्यावरच टीकेची झोड उठली होती. मात्र शोभा डेंचं टार्गेट ठरलेल्या दौलतराम जोगावत यांनी मोठ्या मनाने आभार व्यक्त केले आहेत.
शोभा डे यांनी फोटो ट्वीट केल्यामुळेच आपल्याला उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार, असं दौलतराम जोगावत म्हणाले. जोगावत यांचं वजन 180 किलोवरुन पुढील 18 महिन्यात शंभर किलोवर येण्याची अपेक्षा आहे.
मुंबईतील सैफी रुग्णालयात जोगावत यांच्यावर गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर झाली. यादरम्यान त्यांचं साडेतीन किलो वजन कमी झालं. यात लहान आतड्यांची पुनर्रचना करुन उदराची पोकळी कमी केली जाते. या सर्जरीपूर्वीही जोगावत यांचं दोन किलो वजन कमी झालं होतं.
पुढील दीड वर्ष जोगावत यांना लिक्वीड डाएट देण्यात येणार आहे. त्यानुसार दौलतराम यांचं वजन शंभर किलोने कमी करण्याचा प्रयत्न असेल. सोबतच त्यांचा रक्तदाब आणि मधुमेहही नियंत्रणात येणार आहे.
जोगावत यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत. मध्य प्रदेश सरकारची इच्छा असल्यास, ते हा खर्च उचलू शकतात, मात्र दौलतराम यांच्याकडून एकही पैसा घेतला जाणार नसल्याचं सैफी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
खरं तर, माझं वजन माझ्या कामात कधीच अडथळा ठरलं नाही, मी कायमच अॅक्टिव्ह होतो आणि गुन्हे सोडवण्यासाठी माझा मेंदू तत्पर आहे. माझ्या कामासाठी माझा गौरवही झाला आहे, असं जोगावत म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारीला शोभा डे यांनी एक फोटो ट्वीट करुन 'हेवी पोलिस बंदोबस्त इन मुंबई टुडे' असं कॅप्शन दिलं होतं. भारदस्त दौलतराम यांचा फोटो पाहून मुंबई पोलिसांनी हा आपल्या पोलिस खात्यातील अधिकाऱ्याचा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर सोशल मीडियावर यूझर्सनी शोभा डे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement