Chahat Pandey : 'आप'च्या उमेदवार चाहत पांडेच्या डान्सच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुरळा, पण मतदान किती?
Madhya Pradesh Election Results Chahat Pandey : व्हायरल झालेल्या व्हिडीओने चर्चेत आलेल्या आपच्या उमेदवार चाहत पांडे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे.
Chahat Pandey Video Viral : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालेल्या आम आदमी पक्षाच्या (AAP) उमेदवार चाहत पांडे (Chahat Pandey) यांना मध्य प्रदेशमधील निवडणुकीत (Madhya Pradesh Election Result) दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून चाहत पांडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते जयंत मलैया हे 35 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
मध्य प्रदेशातील दमोह येथे राहणारी टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे या वर्षी जूनमध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या यांच्या विरोधात पक्षाने चाहत यांना दमोहमधून उमेदवारी दिली. त्याचवेळी काँग्रेसचे विद्यमान आमदार अजय टंडन यांचाही या तिरंगी लढतीत सहभाग आहे.
कोण आहे चाहत पांडे?
अभिनेत्री चाहत पांडेने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने वयाच्या 17 व्या वर्षी पवित्र बंधन या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे तेनालीरामन, राधा कृष्णन, सावध इंडिया, नागिन-2, दुर्गा-माता की छाया, अलादीन आणि क्राइम पेट्रोलसह अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. सध्या ती 'नाथ जेवर या जंजीर' या टीव्ही शोमध्ये महुआची भूमिका साकारत आहे.
व्हिडीओ व्हायरल
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान चाहत पांडेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये चाहत पांडे ही 'लडका आँख मारे' या गाण्यावर थिरकली होती. तिच्या या व्हिडीओवर काहींनी नाराजी व्यक्त केली. तर, काहींनी कौतुकही केले होते.
It appers that, Chahat Pandey Aam Aadmi Party MLA candidate from Madhyapradesh is enjoying herself 😃👌👍 pic.twitter.com/j5R3filzWS
— Jyoti Prakash Haldar🇮🇳 (@haldarprakash) November 25, 2023
निवडणुकीत किती मते?
मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून चाहत पांडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनंतर, भाजपचे जयंत मलैया यांना 65 हजार 453 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेसचे उमेदवार अजय टंडन यांना 35 हजार 315 मते मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बसपाचे उमेदवार प्रताप रोहीत असून त्यांना 2028 मते मिळाली आहेत. चौथ्या स्थानी आम आदमी पक्षाच्या उमेदवार चाहत पांडे यांना 1535 मते मिळाली आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या मतदारसंघातील मतमोजणीच्या 21 पैकी 12 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.