एक्स्प्लोर
Advertisement
बेळगावच्या उपमहापौरपदी मराठी गटाच्या मधूश्री पुजारी
महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवल्यामुळे कन्नड गटाचाच महापौर होणार हे नक्की होते. कारण बहुमत असलेल्या मराठी गटाकडे अनुसूचित जातीचा नगरसेवक नव्हता.
बेळगाव : बेळगाव महापौरपदी कन्नड गटाचे बसप्पा चिक्कलदिनी यांची बिनविरोध निवड झाली तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी गटाच्या मधूश्री पुजारी यांनी विजय मिळवला.
मधूश्री पुजारी यांनी कन्नड गटाच्या उमेदवार शांता उप्पार यांचा 9 मतांनी पराभव केला. मधूश्री पुजारी यांना 32 तर शांता उप्पार याना 23 मते मिळाली. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपदी बिनविरोध निवड झाली.
महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवल्यामुळे कन्नड गटाचाच महापौर होणार हे नक्की होते. कारण बहुमत असलेल्या मराठी गटाकडे अनुसूचित जातीचा नगरसेवक नव्हता. महापौरपदासाठी कन्नड गटातून बसप्पा चिक्कलदिनी आणि सुचेता गंडगुद्री इच्छुक होत्या. पण गुरुवारी सकाळी आमदार सतीश जारकिहोळी यांनी यशस्वी मध्यस्थी करून केवळ बसप्पा चिक्कलदिनी यांना महापौरपदासाठी अर्ज दाखल करायला लावला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी पी. ए. मेघण्णवर यांनी बसप्पा चिक्कलदिनी हे महापौरपदी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
उपमहापौरपद मागास महिलांसाठी राखीव होते. उपमहापौरपदासाठी मराठी गटातून मधूश्री पुजारी, मेधा हळदणकर आणि मीनाक्षी चिगरे इच्छुक होत्या. अखेर मराठी गटातून मधूश्री पुजारी यांची निवड झाली आणि चिगरे आणि हळदणकर यांनी आपले अर्ज मागे घेतले. मधूश्री पुजारी आणि शांता उप्पार यांच्यात लढत झाली. मधूश्री पुजारी याना 32 तर शांता उप्पार यांना 23 मते मिळाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
भविष्य
भविष्य
Advertisement