LPG Price : आजपासून LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला; मुंबईतील दर 859 रुपयांवर, तुमच्या शहरातील किंमत काय?
LPG Price Hike : विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी 25 रुपयांची वाढ केली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नईतील एलपीजी सिलेंडरच्या किमती काय?
नवी दिल्ली : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना अनुदानीत एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हे नवे दर सोमवार रात्रीपासून लागू होणार आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 859.50 रुपयांवर पोहोचले आहेत. या अगोदर 1 जुलैला सिलेंडरचे दरात 25.50 रुपयांनी वाढ झाली होती.
या वर्षी घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 165 रुपयांची वाढ
जून महिन्यात दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किंमत 809 रुपये होती. त्यानंतर 1 जुलैला सिलेंडरचे दरात वाढ होत किंमत 834 रुपये झाली. दरम्यान 1 जानेवारीपासून आजपर्यंतच्या दर बघितले तर गेल्या आठ महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत 165 रुपयांची वाढ झाली आहे.
देशातील मुख्य शहरातील सिलेंडरचे दर
दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 886 रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 859.50 रुपये असणार आहे. लखनौमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 897.50 रुपयांवर पोहोचल्या आहेत.
घरगुती गॅससोबतच 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दरही 68 रुपयांनी वाढलेत. यापुर्वी 1 जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.
तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीची दर महिन्याला नोंद ठेवते आणि त्यानंतर किंमत वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेते. प्रत्येक राज्यात टॅक्स वेगवेगळा असल्याने सिलेंडरच्या दर कमी जास्त बघायला मिळतात.
संबंधित बातम्या :
Cylinder Man : सोशल मीडियाने कॉमन मॅन सागरला रातोरात बनवलं 'सिलेंडर मॅन'