रेल्वेचं तिकीट हरवल्यास काळजी करु नका, डुप्लिकेट तिकीट कसं मिळवायचं?
रिजर्व्हेशन काउंटरवर घेतलेले तिकीट डिजिटल स्वरुपात दाखवणे वैध नाही. आपण ऑफलाईन तिकीट घेतले असल्यास, आपल्याला मूळ तिकीटच दाखवावे लागेल.
![रेल्वेचं तिकीट हरवल्यास काळजी करु नका, डुप्लिकेट तिकीट कसं मिळवायचं? Lost Your Train Tickets Indian Railways Rule for Lost Tickets Know How To Get New Train Tickets रेल्वेचं तिकीट हरवल्यास काळजी करु नका, डुप्लिकेट तिकीट कसं मिळवायचं?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/13101218/Railway-Ticket.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रेल्वेने विनातिकीट प्रवास करताना दंड बसण्याची दाट शक्यता असते. मात्र बर्याचदा आपण ट्रेनचं तिकीट घाईगडबडीत विसरतो किंवा आपल्याकडून ते हरवतं. अशा परिस्थितीत आपल्याला बर्याच समस्यांना सामोरे जावं लागत. परंतु आता तंत्रज्ञानाच्या युगात टेन्शन घेण्याची गरज नाही. नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण आता ट्रेनचं डुप्लिकेट तिकीट सहज काढू शकता. आयआरसीटीसी मार्फत जर तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाईन बुक केलं असेल तर पुन्हा एकदा वेबसाईटवर जाऊन तुमच्या खात्यातून तुम्ही तिकीट प्रिंट करु शकता. जर आपण ऑफलाइन तिकीट (तिकीट काऊंटरवर) घेतले असेल तर नजीकच्या कोणत्याही स्टेशनवर जाऊन तुम्ही पीएनआर नंबरद्वारे डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता.
डुप्लिकेट तिकिट मिळविण्यासाठी आपल्याला आपल्याला आयडी प्रूफची देखील आवश्यकता लागू शकेल. डुप्लिकेट तिकिट मिळवण्यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ विचारला जाऊ शकतं. या व्यतिरिक्त, तिकीट काउंटरवर आपल्याला आपल्या ओळखीशी संबंधित काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्याचे उत्तर आपल्याला द्यावी लागतील. डुप्लिकेट तिकीट मिळवण्यासाठी आपण रिजर्व्हेशन काऊंटरवर जाऊन हरवलेल्या तिकिटाबाबत पत्र देखील देऊ शकता. यानंतर तुम्हाला डुप्लिकेट तिकिट दिले जाईल. डुप्लिकेट तिकिटासाठी काही शुल्क आकारलं जाऊ शकतं.
रिजर्व्हेशन काउंटरवर घेतलेले तिकीट डिजिटल स्वरुपात दाखवणे वैध नाही. आपण ऑफलाईन तिकीट घेतले असल्यास, आपल्याला मूळ तिकीटच दाखवावे लागेल. ऑफलाईन तिकिटाचं प्रिंट आऊट दाखवल्यानंतर आपल्याला ट्रेनमध्ये जागा दिली जाणार नाही. तसेच दंडही भरावा लागू शकतो.
पीएनआर क्रमांक लक्षात ठेवणे महत्वाचे
डुप्लिकेट तिकिट घेण्यासाठी पीएनआर क्रमांक लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. आपण पीएनआर क्रमांक लक्षात न ठेवल्यास डुप्लिकेट तिकीट मिळू शकणार नाही. तिकीट बुकिंगनंतर प्रत्येक प्रवाशाला पीएनआर क्रमांक दिला जातो. पीएनआर नंबरद्वारे ट्रेनमधील आपली सीट ओळखली जाते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)