एक्स्प्लोर

Loksabha Election 2024 : पॉलिटीकल संडे! हरियाणात भाजप विरोधातील 25 बडे नेते एकत्र येणार, महाराष्ट्रातून पवारांसह शिवसेनेचे राऊत राहणार उपस्थित

आज हरियाणामध्ये भाजप विरोधातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. हरियाणातील फतेहाबादमध्ये आज 17 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Loksabha Election 2024 : आजचा (25 सप्टेंबर) रविवार हा राजकीय घडामोडींचा असणार आहे. कारण आजच्या दिवसात वेगवेगळ्या घडामोडी घडणार आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाची घडामोड म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज हरियाणामध्ये भाजप विरोधातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. हरियाणातील फतेहाबादमध्ये आज 17 विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

विरोधी पक्षातील 25 बडे नेते उपस्थित राहणार, काँग्रेस, आपला आमंत्रण नाही

आज माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये इंडियन नॅशनल लोक दलाने (INLD) विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आहेत. इतकेच नाही तर इंडियन नॅशनल लोकदल काँग्रेसपासून वेगळी तिसरी आघाडी बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आयएनएलडीने विरोधी पक्षातील 25 मोठ्या नेत्यांना रॅलीसाठी आमंत्रित केले आहे. त्यात 12 असे पक्ष आहेत जे एकेकाळी एनडीएचा भाग होते. विरोधकांच्या या व्यासपीठाकडे भाजप आणि काँग्रेस विरोधी म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच भारतीय राष्ट्रीय लोकदलाने काँग्रेस, सीपीआय, आम आदमी पार्टी आणि बसपा यांना आमंत्रण पाठवले नाही.

हरियाणात कोण-कोणते नेते उपस्थित राहणार 

हरियाणात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला अनेक नेते उपस्थिती लावणार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, द्रमुकच्या खासदार कनिमोझी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, टीएमसीचे सुखेंदू शेखर रॉय, शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत आणि सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादवही विरोधकांच्या ताकदीच्या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव घेणार सोनिया गांधी यांची भेट 

भाजप आणि काँग्रेसशिवाय फतेहाबादमध्ये तिसर्‍या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू असतानाच  दुसरीकडे आज नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव हे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात 2024 च्या रणनीतीवर चर्चा करण्याच येणार आहे.  दोन्ही नेते भाजपला घेरण्यासाठी सर्व मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaGateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वरABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Embed widget