एक्स्प्लोर
Advertisement
प्रभाससोबत नाव जोडल्याने वायएस जगनमोहन रेड्डींची बहिण पोलिसात!
गेल्या काही दिवसांपासून वायएस शर्मिला आणि प्रभास यांच्या संबंधांबाबत सोशल मीडियावर चर्चा आहे.
हैदराबाद : 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत नाव जोडल्याने, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस. जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या अफवा पसरवण्यामागे टीडीपीचा हात असल्याचा आरोपही वाय एस शर्मिला यांनी केला आहे.
"आजपर्यंत मी कधीही प्रभासला भेटले नाही आणि कधी त्याच्याशी बोललेही नाही. मला शंका आहे की, या अफवा पसरवण्यात टीडीपीचा हात आहे," असं शर्मिला यांनी सांगितलं. त्याच्या तक्रारीनंतर हैदराबाद सायबर क्राईम सेलने गुन्ह्याची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे.
आयटी अॅक्टच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद
सायबर सेलचे अतिरिक्त आयुक्त केसीएस रघुवीर म्हणाले की, "आम्ही आयटी अॅक्टच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोबतच यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये पसरलेल्या माहितीची चौकशी सुरु केली आहे. ज्या-ज्या लोकांनी ही माहिती अपलोड केली आहे, त्यांची चौकशी केली जाईल."
"लोकसभा निवडणूक जवळ आहे. यासाठी मला राजकीय निशाणा बनवलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी माझ्याविरोधात अफवा पसरवून बदनामीचा प्रयत्न सुरु आहे. या अफवा पसरवण्यामागे टीडीपी आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे," असा दावा शर्मिला यांनी केला.
"याआधी 2014 च्या निवडणुकीआधीही माझ्या आणि प्रभासच्या संबंधांबाबत सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. पण निवडणुकीनंतर या अफवा शमल्या. आता लोकसभा निवडणुकीआधी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवली जात आहे," असं शर्मिला यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून वायएस शर्मिला आणि प्रभास यांच्या संबंधांबाबत सोशल मीडियावर चर्चा आहे. शर्मिलाचे आणि प्रभासचे अनेक फोटो आणि माहिती व्हायरल होत असून या दोघांमध्ये काही ना काही नातं असल्याचा उल्लेख त्यात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement