एक्स्प्लोर
अकाऊण्टमधील गैरव्यवहार बँकेला 3 दिवसात कळवल्यास पूर्ण भरपाई
नवी दिल्ली : बँक खातेदारांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहार करता यावेत, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी नियमावली जाहीर केली आहे. तुमच्या बँक अकाऊंटवरुन गैरव्यवहार करण्यात आल्यास तीन दिवसांत बँकेला त्याविषयी माहिती द्यावी, तसं केल्यास तुम्हाला कोणतंही नुकसान सहन करावं लागणार नाही.
विशेष म्हणजे तीन दिवसांत तुम्ही बँकेला अशा चुकीच्या व्यवहारांविषयी माहिती दिली, तर दहा दिवसांत संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात क्रेडीट होईल. तर थर्ड पार्टी फ्रॉडविषयी चार ते सात दिवसात ही सूचना बँकेला दिल्यास ग्राहकांना 25 हजार रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
वेळेत ही सूचना बँकेला दिली नाही, तर खातेदारालाच संपूर्ण नुकसान सहन करावं लागणार आहे. ग्राहकाच्या हलगर्जीने (पेमेंट विषयीचे डिटेल्स शेअर केल्याने) हे गैरव्यवहार झाले असतील, तर मात्र फटका तुम्हालाच सहन करावा लागेल.
आरबीआयनं काढलेल्या नव्या नियमानुसार बँकांना ग्राहकांचे मोबाईल नंबर त्यांच्या अकाऊंट नंबरशी संलग्न करावे लागणार आहेत. बँकांनी केलेल्या मेसेजेसना रिप्लाय करण्याचा पर्याय द्यावा अशीही शिफारस करण्यात आली आहे.
यापुढे तुमच्या अकाऊंटवरुन चुकीचे व्यवहार कोणामार्फत करण्यात आले आणि त्याची माहिती वेळेवर तुम्ही बँकेला दिलीत, तर ते नुकसान बँक स्वतः सहन करणार आहे. बँकांना इन्शुरन्स सेटलमेंटची वाट न पाहता ही रक्कम 10 दिवसांत ग्राहकाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.
...तर ग्राहकांना पूर्ण भरपाई
1. बँकेकडून कॉन्ट्रिब्युटरी फ्रॉड, हलगर्जी किंवा चूक झाली आणि ग्राहकांनी बँकेला सूचना दिली नसली तरी ग्राहकांना फटका बसणार नाही. पूर्ण भरपाई मिळेल.
2. अनऑथराईज्ड बँक व्यवहार बँक किंवा ग्राहकांच्या चुकीमुळे झाला नाही, तिसऱ्याच पक्षाकडून झाला असेल, तर त्याबाबतचा मेसेज आल्यानंतर, तुम्हाला तीन दिवसात कळवावं लागेल. त्यावेळी तुम्हाला पूर्ण भरपाई मिळेल.
...तर 5 ते 25 हजारापर्यंत भरपाई
- जर तुमच्या चुकीमुळे म्हणजे पासवर्ड शेअर करणं, एटीएम कार्ड/पिन वापरायला दिल्यामुळे फ्रॉड झाला, आणि त्याबाबत तुम्हाला समजल्यावर तातडीने बँकेला कळवल्यास, तुम्ही माहिती दिल्यानंतरचं नुकसान बँक सहन करेल. बँकेला कळवण्यापूर्वी जे काही नुकसान झालं असेल, ते तुमचं असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement