एक्स्प्लोर
हॉटेलच्या रुममध्ये मग्न जोडप आणि बिबट्याची एन्ट्री

नवी दिल्ली: डोंगर, दऱ्या-खोऱ्यांचं शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नैनीतालच्या एका हॉटेलच्या रूममध्ये मग्न जोडप्याच्या सोबतीला बिबट्याने एन्ट्री केल्याने मोठा गोंधळ उडाला
नैनीतालमधील तल्लीतालजवळच्या एका हॉटेलच्य हा बिबट्या रूममध्ये सकाळी 4.30 वाजता शिरला, त्यानंतर रूममधील जोडप्याने भीतीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
नैनीताल फिरण्यासाठी आलेल्या सुमित राठेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी जेव्हा घडाळ्याचा गजर झाला, त्यावेळी एक भलेमोठे मांजर बाथरूमकडे जाताना त्यांनी पाहिले. अंधारामुळे त्यांना ते मांजर वाटलं. पण नंतर जेव्हा त्यांना समजलं, त्यावेळी ते मांजर नसून बिबट्या होता. या बिबट्याला पाहून राठोड अतिशय भयभित झाले. त्यांनी बिबट्या बाथरूममध्ये शिरताच बाहेरून त्या बाथरूमचा दरवाजा लावून घेतला.
यानंतर सुमित यांनी तत्काळ हॉटेल प्रशासनाला यांची माहिती दिली. हॉटेल प्रशासनाने पोलीस आणि वनविभागाला याची माहिती दिली. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.
या घटनेची परिसरातील नागरिकांना समजताच, बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबिट्याला डार्ट नावाची गोळी मारून बेशुद्ध केले, अन त्या हॉटेलच्या बाथरूममधून बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ काहींनी बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
