Coronavirus Cases: गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद , तर 657 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 657 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 657 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर आज 13.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
कालच्या दिवसापेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवली आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत आहे. काल देशात 67 हजार 84 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामानाने आज रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, मृत्यूच्या संख्येत देखील घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सक्रिया रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे, सद्या देशात 6 लाख 97 हजार 802 सक्रिय रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा हा 5 लाख 7 हजार 177 झाला आहे. आत्तापर्यंत देसात 4 कोटी 13 लाख 31 हजार 158 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
आतापर्यंत लसीचे 172 कोटी डोस
दरम्यान, देशात सध्या लसीकरण वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत देशात 172 कोटी लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. 15 ते 18 वयोगटातील मुलांना देखील लसीकरण वगाने देण्याची प्रक्रिया देशात सुरू आहे. काल दिवसभरात देशात 48 लाख 18 हजार 867 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देशात 172 कोटी 79 लाख 51 हजार 432 डोस देण्यात आले आहेत.
केरळमध्ये काल कोरोनाचे नवीन 18,420 रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 63,65,051 झाली आहे. यापूर्वी, बुधवारी केरळमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची 23 हजार 253 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. केरळच्या आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात 341 रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्यातील साथीच्या आजाराने एकूण मृतांची संख्या 61,134 झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- COVID 19 new Variants: अजूनही काळजी घेणं गरजेचं, कोरोना व्हायरसला घेऊन WHO चं मोठं विधान, म्हणाले...
- Nirmala Sitharaman : मोदी सरकारच्या काळात देशाची वाटचाल 'अमृतकाळा'च्या दिशेने: अर्थमंत्री सीतारमण