Coronavirus Cases: गेल्या 24 तासात देशात 19 हजार 968 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 673 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात 19 हजार 968 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 673 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Coronavirus Cases Today in India: सध्या देशभरात कोरोना (Coronavirus)रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 19 हजार 968 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 673 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. काल देशभरात 22 हजार 270 रुग्ण आढळले होते. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 48 हजार 847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या घटली
सध्या देशभराता कोरोनाचा विळखा कमी होत आहे. रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा देखील कमी झाला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 2 लाख 24 हजार 187 झाली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 5 लाख 11 हजार 903 झाली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 20 लाख 86 हजार 383 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
केरळमध्ये कोरोनाचे नवीन 6,757 रुग्ण
शनिवारी केरळमध्ये कोरोनाचे 6 हजार 757 नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर येथील एकूण संक्रमित लोकांची संख्या 64 लाख 63 हजार 563 वर पोहोचली आहे. राज्यात संसर्गामुळे आणखी 524 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 64 हजार 053 वर पोहोचली आहे. यापैकी कोविड-19 मुळे मृत्यूची काही प्रकरणे पूर्वीची आहेत. गेल्या 24 तासांत 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत सुमारे 175 कोटी लसींचे डोस
देशात सध्या वेगाने लसीकरण सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी लस घेतली नाही अशांना लस घेण्याचेआवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 175 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आसले आहेत. काल दिवसभरत 30 लाख 81 हजार 336 डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत लसीचे एकूण डोस 175 कोटी 37 लाख 22 हजार 697 देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: