एक्स्प्लोर
भाजप प्रवेशाची चर्चा, कुमार विश्वास यांचं उपहासात्मक उत्तर
नवी दिल्ली : 'आम आदमी पक्षा'चे कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कुमार विश्वास भाजपमध्ये प्रवेश करुन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असं वृत्त होतं. मात्र कुमार विश्वास यांनी तर्कवितर्कांना फेटाळत भाजपवरच हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान टीडीपीमध्ये सामील होणार : कुमार विश्वास
आम आदमी पक्षाने आज उपहासाने भाजपवर निशाणा साधला. "मला असं समजलं की पंतप्रधान टीडीपीमध्ये सामील होणार आहे, आता हे बातमी म्हणून चालवा, मी तुमच्यासारखीच मस्करी करत आहे," असं ट्वीट कुमार विश्वास यांनी केलं.
https://twitter.com/DrKumarVishwas/status/821559531167567873
मनिष सिसोदियांचाही हल्लाबोल
तर ही अफवा असल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि 'आप'चे नेते मनिष सिसोदिया यांनी सांगितलं. "पंतप्रधान काँग्रेसमध्ये प्रवेश करत असून त्यांची आणि राहुल गांधींची भेटही झाली आहे," असं ट्वीट सिसोदिया यांनी केलं आहे.
https://twitter.com/msisodia/status/821558569229107201
कुमार विश्वास भाजपमध्ये सामील होऊन आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात, असे कसाय लावले जात होता. दरम्यान, कुमार विश्वास यांनी 'आप'च्या तिकीटावर अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement