एक्स्प्लोर
CCTV : मोबाईल बघत चालणाऱ्या तरुणाला बसची जोरदार धडक

मंगळुरु : मंगळुरुमध्ये कर्नाटक राज्य परिवहनच्या बसने रस्त्यावर चालणाऱ्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत तरुण बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे.
हकीम असं तरुणाचं नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. 15 मार्चची ही संपूर्ण थरारक घटना हम्पांकट्टा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
परंतु या घटनेत बस चालकाची घाई आणि पादचाऱ्याचा निष्काळजीपणा समोर आला आहे. खरंतर केएसआरटीसी बसचा चालक दुसऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. तर पादचारी तरुण मोबाईलमध्ये पाहत फुटपाथऐवजी रस्त्यावरुन चालत होता. त्याचवेळी बसने तरुणाला जोरदार धडक दिली.
यानंतर रस्त्यावरील लोक त्याच्या मदतीसाठी धावले. तरुणाला किरकोळ जखम झाल्याचं कळतं.
दरम्यान वाहतूक पश्चिम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















