Kolkata Metro Rail | 37 वर्षांनंतर कोलकाता मेट्रोमध्ये मोठा बदल! जाणून घ्या काय निर्णय झाला?
Metro Rail Kolkata: कोलकाता मेट्रो रेल्वेने 37 वर्षांनंतर मोठा बदल केला आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेने रविवारी एसी नसलेल्या डब्यांना औपचारिकपणे निरोप दिला.
Metro Rail Kolkata: कोलकाता मेट्रो रेल्वेने 37 वर्षांनंतर मोठा बदल केला आहे. कोलकाता मेट्रो रेल्वेने रविवारी नॉन-एसी डब्यांना औपचारिकरित्या निरोप दिला. यापैकी काही डबे 1984 मध्ये देशातील पहिली भूमिगत रेल्वे सुरू झाल्यापासून सेवेत होते. कोलकाता मेट्रोने 1984 साली आजच्या दिवशी कामकाज सुरू केले होते. नॉन-एसी कोच काढण्याच्या प्रक्रियेच्या स्मरणार्थ महानायक उत्तम कुमार स्टेशनवर 'डाउन द मेमरी लेन' नावाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
मेट्रो रेल, कोलकाता ने ट्वीट केले, "आम्ही आमच्या 37 व्या स्थापनादिनी म्हणजेच रविवारी आमच्या नॉन-एसी मेट्रो कोचच्या ताफ्याला निरोप देत आहोत." कोलकाता मेट्रो स्थानकांची नावे बंगालच्या अनेक व्यक्तिमत्त्वांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. कोलकाता मेट्रो स्थानकांची काही नावे म्हणजे कवी सुभाष स्टेशन, महानायक उत्तम कुमार स्टेशन, गिरीश पार्क, जतीन पार्क, कवी जनरुल स्टेशन, महात्मा गांधी रोड, नेताजी भवन स्टेशन, शहीद खुदीराम स्टेशन अशा प्रकारे आहेत.
We are bidding farewell to our fleet of non-ac Metro rakes tomorrow on our 37th Foundation Day. pic.twitter.com/cOIT7X2yhf
— Metro Rail Kolkata (@metrorailwaykol) October 23, 2021
कोलकाता मेट्रोचे महाव्यवस्थापक मनोज जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "या डब्यांच्या निरोपाचा एक भाग म्हणून आम्ही एक छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे, जे मेट्रो रेल्वेचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य दर्शवेल." ते म्हणाले की, लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मेट्रो रेल्वेने शहराने सामायिक केलेले क्षण पुन्हा जिवंत करण्याची ही एक संधी आहे. जोशी म्हणाले, मेट्रो रेल्वेचे जाळे वाढविण्याचे काम सुरू असून दोन ते तीन वर्षांत मेट्रोचे नवे मार्ग सुरू होतील.
24 ऑक्टोबर 1984 रोजी कोलकाता येथेच देशातील पहिली भूमिगत मेट्रो रेल्वे सुरू झाली होती. त्यावेळी कोलकाता मेट्रोची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली होती.