एक्स्प्लोर

Uniform Civil Code Draft: संपत्तीत समान वाटा...इद्दतवर बंदी.. समान नागरी कायद्यात आहे तरी काय? कायदा आयोगाकडून मसुदा तयार

Uniform Civil Code Draft: कायदा आयोगाकडे समान नागरी कायद्यासाठी (Uniform Civil Code) जवळपास 9.5 लाख सूचना, मते आली. यातील बहुतांशी सूचना या कायद्याच्या समर्थनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Uniform Civil Code Draft:  देशात समान नागरी कायदा तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. संसदेच्या कायदा आणि न्याय विभागाच्या संयुक्त समितीची बैठक आज पार पाडली. तर, दुसरीकडे कायदा आयोगाने समान नागरी कायद्याचा मसुदा (Uniform Civil Code Draft) तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाकडे समान नागरी कायद्यासाठी (Uniform Civil Code) जवळपास 9.5 लाख सूचना, मते आली. यातील बहुतांशी सूचना या कायद्याच्या समर्थनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

समान नागरी कायद्यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, एकापेक्षा अधिक विवाह करण्यास पूर्ण बंदी असणार आहे. त्याशिवाय, मुस्लिम धर्मातील इद्दत आणि हलाला सारख्या प्रथांना बंदी घालण्यात येणार आहे. वारसदारांमध्येही मुलगा आणि मुलगी या दोघांना समान अधिकार असणार आहे. पतीचा मृत्यू झाल्यास आणि अपत्य नसल्यास मुस्लिम महिलेला संपत्तीचा पूर्ण हिस्सा मिळणार आहे. मात्र, पतीच्या भावांना त्याच्या संपत्तीचा कोणताही हिस्सा मिळणार नाही. कायदा आयोगाकडे आलेल्या सूचनांच्या आधारे समान नागरी कायद्याच्या मसुद्यात बदल होऊ शकतो. 

मसुद्यात काय?

- लैंगिक समानतेवर भर असणार आहे. 
- विवाहाचे वय मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 वर्ष असणार आहे.
- घटस्फोटासाठी महिला आणि पुरुषांसाठी एकसारखा नियम, आधार असणार
- मुलं दत्तक घेण्यासाठीचा अधिकार सगळ्यांना समान असणार आहे. 
- एकापेक्षा अधिक विवाह, बहुपत्नीत्व, इद्दत, हलाला सारख्या प्रथांना विरोध
- विवाह नोंदणी अनिवार्य 
- आदिवासींना समान नागरी कायद्यातून वगळण्यात येणार आहे. 
- लिव्ह इन रिलेशनशिपचा उल्लेख नाही

पूजा, नमाज आणि लग्न परंपरा पद्धतींवर कोणत्याही प्रकारची बंधने घालण्यात आली नाहीत. नागरीक आपल्या धार्मिक नियमांचे पालन करू शकतात. हिंदू अविभक्त कुटुंबावर (Hindu Undivided Family -HUF) कोणतेही बंधने नसणार. HUF नुसार आयकरात सवलत मिळते. आदिवासींना मात्र कायद्यातून सवलत देण्यात येणार आहे. कायदा आयोगाने तयार केलेला मसुदा हा प्राथमिक असून त्यात आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. 

संसदेच्या संयुक्त समितीची बैठक

समान नागरी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीची बैठक झाली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले की, समान नागरी कायदा तयार करणे ही काळाची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या काही निकालातही याची गरज अधोरेखित केली आहे. समान नागरी कायद्याला पक्षीय मतभेद विसरून अनेकांनी पाठिंबा दिला असल्याचे  गोयल यांनी म्हटले. 

शनिवारी, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी समान नागरी कायद्याचा मसुदा काय आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर करावे, अशी मागणी केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर का आंदोलनं होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
Embed widget