एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केरळमध्ये तब्बल 52 लाख 50 हजारांच्या नव्या नोटा जप्त
मलप्पुरम : नोटाबंदीला दोन महिने उलटल्यानंतरही नव्या नोटांची मोठी रोकड सापडणं सुरुच आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी 52 लाख 50 हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. यामध्ये सर्व 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा होत्या. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर कोझीकोड आणि मंजेरी दरम्यान वल्लुवम्पुरम येथे एका गाडीचा तपास करताना 50 लाख 50 रुपयांची रोकड सापडली. फजल-उर-रहमान आणि उन्नीमोई या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक केलेल्या दोघांनाही पोलिसांनी एवढ्या मोठ्या रकमेचा तपशील मागितला. मात्र, दोघांपैकी कुणीही रकमेचा तपशील देऊ न शकल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केले.
केरळमध्येच दुसरीकडे अशीच एक घटना समोर आली आहे. नियमित तपासादरम्यान मंजेरी पोलिस ठाण्याजवळच बाईकस्वाराकडे 2 लाख 50 हजारांच्या नव्या नोटा मिळाल्या. या प्रकरणातील आरोपी जमशीर मंजेरीजवळील पट्टाकुलम येथील रहिवाशी असून, पोलिसांनी त्यालाही अटक केली. मात्र, काही जमशीरची जामिनावर सुटका झाली आहे.
केरळमधील मंजेरी भागात दोन कारवायांमध्ये 52 लाख 50 हजार रुपयांच्या नव्या नोटा सापडल्याने पोलिसांचा पुढील तपास अधिक वेगाने सुरु झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement