एक्स्प्लोर

Kerala Floods : केरळात पावसाचा रुद्रावतार; अनेक भागांत भूस्खलन, मृतांची संख्या 31 वर

Kerala Floods : केरळात पावसाची कोसळधार सुरु असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. तर काही भागांत भूस्खलनंही झालं आहे.

Kerala Floods : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 31 वर पोहोचली आहे. केरळमधील पूरग्रस्त भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, अनेक पूरग्रस्त भागांत लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरु आहे. केरळातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तसेच पटनमथीटाच्या खालच्या भागांत आज पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या भागांत एनडीआरएफची विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. तसेच या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 

मदत आणि बचाव कार्य सुरु 

पावसामुळे निसर्गाच्या कहराला सामोरे जाणाऱ्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे.

कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना उधाण आले असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली. नदीच्या काठावरही मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत.

पंतप्रधान मोदींची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

आस्मानी संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी ट्विट केले, की "केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जखमी आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी ग्राऊंडवर काम केले जात आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."

पंतप्रधान मोदींनी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी दु: ख व्यक्त केले. त्यांनी ट्वीट केले, "केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती सहवेदना."

11 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

हवामान विभागाने केरळमधील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड या 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget