एक्स्प्लोर

Kedarnath: गांजा 'अशा' प्रकारे करतो डोक्यावर परिणाम; गाढव, घोडे यांसारख्या प्राण्यांनाही याची नशा होते का? जाणून घ्या...

Cannabis Effects: भारतात केल्या जाणाऱ्या नशांपैकी गांजाचा नशा हा एक आहे. बरेच जण गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात, त्याचा आपल्या आणि प्राण्यांच्या मनावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.

Smoking Weed To Donkey in Kedarnath : सध्या सोशल मीडियावर केदारनाथचा (Kedarnath) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक घोड्याला जबरदस्ती गांजा ओढायला लावताना दिसत आहेत. अर्थात हे निंदनीय, अमानवी कृत्य आहे. 27 सेकंदाचा हा व्हिडीओ उत्तराखंडमधील केदारनाथ ट्रॅकचा (Kedarnath Track) असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक प्रश्नही मनात येतो की, गांजामध्ये असं काय असतं ज्यामुळे लोक शुद्ध हरपून स्वत:च्या धुंदीत वागतात? आणि या गांजाचा परिणाम प्राण्यांवरही होतो का? तर जाणून घेऊया...

भारतात गांजावर बंदी

भारतात केल्या जाणाऱ्या नशांमध्ये गांजाच्या नशेचा समावेश होतो. देशात गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात होते. सरकारने गांजाचे सेवन आणि विक्री या दोन्हींवर बंदी घातली असली तरी त्याचा व्यवसाय छुप्या पद्धतीने केला जातो. 1985 मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारने NDPS म्हणजेच नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कायदा आणला होता आणि तेव्हापासून या कायद्याअंतर्गत गांजावर भारतात बंदी घालण्यात आली होती.

गांजाची इतर नावं

गांजाला मारिजुआना (Marijuana), वीड (Weed), स्टफ (Stuff), माल, पॉट (Pot), ग्रास (Grass) इत्यादी नावांनीही ओळखले जाते. असे असले तरी त्याचे वैज्ञानिक नाव कॅनबस (Cannabis) आहे. गांजाच्या वनस्पतीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी दोन सर्वात प्रसिद्ध आहेत. पहिला कॅनबस सॅटिवा (Cannabis Sativa) आणि दुसरा कॅनबस इंडिका (Cannabis Indica) आहे. गांजा पिणारे बहुतेक लोक या दोन प्रकारच्या गांजाचे सेवन करतात. कॅनबसला सामान्य भाषेत भांग म्हणतात, यातून तीन प्रकारच्या ड्रग्सची निर्मिती होते. यातील पहिला प्रकार म्हणजे गांजा, दुसरा भांग आणि तिसरा चरस.

कॅनबसच्या झाडाला जी फुलं येतात, ती हातावर घासून किंवा मळून हातावर एक चिकट काळा थर जमा होतो. या थराचा काळा गोळा बनवतात, त्याला चरस म्हणतात. तर, या झाडाची पानं वाटून हातावर मळून त्याचा गोळा बनवला जातो, याला भांग म्हणतात.

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये गांजावर बंदी आहे. तथापि, त्याचा व्यापार आणि वापर काही देशांमध्ये कायदेशीर आहे. धूम्रपानासाठी गांजाचा अधिक वापर केला जातो. दुसरीकडे, काही लोक नशा करण्यासाठी त्याचा रोल बनवतात आणि पितात. 

शरीरावर होतो गांजाचा परिणाम

गांजाचे THC आणि CBD असे दोन प्रकार आहेत. गांजा ओढल्याने THC आणि CBD मनावर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. THC मुळे नशा वाढते आणि CBD मुळे त्याचा प्रभाव कमी होतो. वास्तविक, CBD चिंता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. परंतु, जेव्हा गांजामध्ये THC चे प्रमाण CBD पेक्षा जास्त असते तेव्हा आपलं डोकं नीट काम करणं बंद करतं. धूम्रपान केल्याने THC रक्ताद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतं आणि आपली संपूर्ण व्यवस्था बिघडते. मेंदू आपले सर्व काम न्यूरॉन्सच्या मदतीने करते आणि गांजाचे सेवन केल्यावर हे न्यूरॉन्स नियंत्रणाबाहेर जातात.

प्राण्यांवर गांजाचा परिणाम

मिशीगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील (Michigan state university) पशुवैद्यकीय निदान प्रयोगशाळेचे संप्रेषण व्यवस्थापक कोर्टनी चॅपिन म्हणतात की, प्राण्यांवर नशेच्या पदार्थांचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. नशेचा प्रभाव काहींवर कमी, तर काहींवर जास्त असू शकतो. CBD बऱ्याच बाबतीत प्राण्यांसाठी हानिकारक नाही, परंतु THC हे कुत्रे, मांजर आणि घोडे यांसारख्या इतर अनेक प्राण्यांसाठी विषारी ठरते.

हेही वाचा:

Maharashtra: पावसाळा आला! विकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर 'या' पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US India Tariffs : भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
Delhi Accident: BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, पाकिस्तान संतापला; अम्पायरची ICC कडे तक्रार, पीसीबीने दिला इशारा
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, पाकिस्तान संतापला; अम्पायरची ICC कडे तक्रार, पीसीबीने दिला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US India Tariffs : भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
Delhi Accident: BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, पाकिस्तान संतापला; अम्पायरची ICC कडे तक्रार, पीसीबीने दिला इशारा
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, पाकिस्तान संतापला; अम्पायरची ICC कडे तक्रार, पीसीबीने दिला इशारा
ITR Filing : शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
Nashik Crime Uddhav Nimse : हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
गुणरत्न सदावर्तेंची लेक निघाली लंडनला, बॅरिस्टर होऊन परतणार; मंत्री छगन भुजबळांकडून खास शुभेच्छा
गुणरत्न सदावर्तेंची लेक निघाली लंडनला, बॅरिस्टर होऊन परतणार; मंत्री छगन भुजबळांकडून खास शुभेच्छा
Embed widget