भीषण! कर्नाटकात स्फोटकं नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट; 8 मजुरांचा मृत्यू
स्फोटाचं स्वरुप इतकं मोठं होतं, की आजुबाजूच्या परिसरातही याचा हादरा जाणवला. इतकंच नव्हे तर, या शक्तिशाली स्फोटामुळं रस्त्यालाही भेगा गेल्या.
बंगळुरु : दक्षिण भारतातील कर्नाटकात असणाऱ्या शिवमोगा जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक मोठा स्फोट झाल्याची बाब निदर्शनास आली. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला. ज्यामुळं या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचं स्वरुप इतकं मोठं होतं, की आजुबाजूच्या परिसरातही याचा हादरा जाणवला. इतकंच नव्हे तर, या शक्तिशाली स्फोटामुळं रस्त्यालाही भेगा गेल्या. कर्नाटकची राजधानी असणाऱ्या बंगळुरू येथून 350 किमी अंतरावर असणाऱ्या शिवमोगा इथं ही घटना घडली.
खोदकामासाठी नेली जात होती स्फोटकं....
सूत्रांच्या माहितीनुसार खोदकामासाठी ही स्फोटकं नेण्यात येत होती. त्याचवेळी दगड तोडण्याच्या ठिकाणी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळं फक्त शिवमोगाच नव्हे, तर चिक्कमंगळुरू आणि दावणगेरे या जिल्ह्यांमध्येही याचे हादरे जाणवले. स्फोटाचं स्वरुप भीषण असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.
According to the information, it is a dynamite blast at Kallugangur/Abbalagere village near Shimoga. Being transported for stone quarrying. Many labourers feared dead. Details awaited. #Shimoga #Shivamogga https://t.co/YpykfsAyW8
— Akash Jain (@akash207) January 21, 2021
सोशल मीडियावरही याबाबतची माहिती काही युजर्सनी पोस्ट केली. प्रथमत: इथं भूकंप आला, असंच अनेकांना वाटलं ज्यानंतर भूगर्भ शास्त्रज्ञांशीही संपर्क साधण्यात आला होता. पण, हा भूकंप नसून एक भीषण स्फोट होता. पोलिसांच्या माहितीनुसार हा स्फोट जिलेटीन नेणाऱ्या एका ट्रकमध्ये झाला. ज्यामुळं ट्रकमधील सर्व मजुरांचा मृत्यू झाला.