Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, 117 जागांवर काँग्रेस तर 76 जागांवर भाजपला आघाडी
Karnataka Assembly Election Result : सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं (Congress) जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 135 जागांवर आघाडी घेतली आहे.
![Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, 117 जागांवर काँग्रेस तर 76 जागांवर भाजपला आघाडी Karnataka Election Result 2023 Counting of votes begins in Karnataka Congress bjp Karnataka news Karnataka Election Result : कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, 117 जागांवर काँग्रेस तर 76 जागांवर भाजपला आघाडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/f96d201480d9e6e439ba9e41b1ec50831683515757762359_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Karnataka Assembly Election Result : कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly Election Result) कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं (Congress) जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. बहुतमाचा आकडा पार करुन काँग्रेस 117 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 76 जागांवर आघाडीवर आहे. काही ठिकाणी मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बेळगावमध्येही काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election Result) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. जवळपास 200 हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बेळगावमधील 18 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बेळगावमध्ये काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. कल सारखे कमी जास्त होत आहेत. मात्र, सध्या मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.
2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद
विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य 10 मे रोजी मतदान पेटीत बंद झालं.
बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार
बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आज दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)