एक्स्प्लोर

Karnataka : सकाळ-संध्याकाळ 90 चा पेग फ्री द्या, दारूच्या किमती कमी करा अन्यथा... दरात 20 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर कर्नाटकात मद्यप्रेमींचे आंदोलन 

Karnataka Alcohol Protest : दारूच्या किमती कमी करा किंवा ती फ्री मध्ये वाटा, अन्यथा आम्ही दारू प्यायचं सोडू, त्यामुळे सरकारच्या महसुलात घट होईल अशी धमकी मद्यप्रेमी आंदोलकांनी दिली आहे. 

उडपी : हलगी वाजवली जातेय... मध्यभागी ठेवलेल्या दारूच्या मोठ्या बाटलीला मोगऱ्याचे गजरे घातले जात आहेत, आरती केली जात आहे. आता तुम्ही म्हणाल काय केलंय काय या वीरांनी? तसं खास काही केलेलं नाही, पण कर्नाटक सरकारविरोधात आंदोलन केलंय. या आंदोलनामागचं कारण ऐकाल तर कपाळावर हात मारून घ्याल. कर्नाटक सरकारने आपल्या अर्थसंकल्पात (Karnatak Budget Alcohol Price Hike) दारुचे दर 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींनी या दरवाढीविरोधात उडपी (Udupi Alcohol Protest) शहरात आंदोलन सुरु केलंय.

कर्नाटकात सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) सरकारने 8 जुलै रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात भारतीय बनावटीच्या विदेशी दारुच्या किंमतीमध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्नाटक सरकारला येत्या वर्षात 36 हजार कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. तसेच सरकारने बीअरवरचा अधिभारही 175 टक्क्यांवरुन 180 टक्क्यांवर आणला. 

आता सरकारने कोणतीही दरवाढ केली की त्या त्या संघटना एकवटतात आणि सरकारविरोधात निदर्शने करतात. पण मद्यप्रेमींची अशी कोणतीच संघटना नाही. मग करणार काय? म्हणूनच आता उडपीत सगळे मद्यप्रेमी एकवटले आणि आंदोलन सुरू केलं. या मद्यप्रेमींनी तर आता थेट सरकारलाच धमक्या दिल्या आहेत. या मद्यपींनी दारु कायमची सोडून देण्याची धमकी दिली. तसं झाल्यास सरकारच्या महसुलामध्ये घट होईल. दारु सोडून अख्ख्या कुटुंबासकट तीर्थाटनाला जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Udupi Alcohol Protest : मद्यप्रेमींची मागणी काय? 

दारू ही कामगार वर्गांकडून सर्वाधिक प्यायली जाते. काम केल्यानंतर कामगारांचे अंग दुखतंय. मग संध्याकाळी त्यांना नायटीचा एक पेग मारावाच लागतोय. त्यामुळे त्यांच्या वेदना कमी होतात. आता कशावरही कर लावला तर आंदोलनं होतात. फक्त दारूवरील कर वाढवल्यावर आंदोलनं होत नाहीत. मग म्हणून दारूवरील कर वाढवायचाच का? आम्ही असं म्हणत नाही की सगळाच कर कमी करा. पण मग काहीतरी कमी करा अशी मागणी या मद्यप्रेमी आंदोलकांनी केली आहे. 

ज्या मद्यपींमुळे राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो त्यांचा रोष आता सरकार पत्करणार का? मद्यपींनी दिलेले इशारे खरंच अंमलात आणणार का? मद्यप्रेमींच्या आंदोलनावर सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

ही बातमी वाचा: 

Disclaimer :  हे फक्त घडलेल्या घटनेचं वृत्ताकन आहे, एबीपी माझा दारू पिण्याचं कोणतंही समर्थन करत नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime Special Report : शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकेनं विद्यार्थ्यांना दिली हत्येची सुपारीBadlapur Politics Special Report:बदलापुरात उद्रेक राज्यभर आंदोलनं,तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपBadlapur Special Report : बदलापूर घटनेवरून राज्यभर संतापाची लाट, शिक्षणसंस्थांसाठी नवी नियमावलीZero Hour Full EP : Samarjeet Ghatge यांच्या नाराजीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची चिंता वाढली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Embed widget