Karauli Violence : खाकीतील माणुसकीचं दर्शन! करौली हिंसाचारादरम्यान कर्तव्यदक्ष पोलिसाचा फोटो व्हायरल, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
Karauli Violence : राजस्थानच्या करौली येथील हिंसाचाराचे फोटो संपूर्ण जगाने पाहिले आहेत. मात्र सोशल मीडिया या हिंसक फोटोंमध्ये खाकीतील माणुसकीचं दर्शन दाखवणारा एक फोटो व्हायरल होतोय.
Karauli Police Viral Photo : राजस्थानमध्ये करौली येथे हिंसाचार उसळल्याने तिथे दहशतीचं वातावरण आहे. परिसरात 7 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू समोर असल्याने ती सर्वांना दिसते, पण कधी कधी त्यामागे दुसरी अधिक चांगली असणारी बाजू लपलेली असते. असाच काहीसा प्रकार राजस्थानच्या करौलीमध्ये घडला आहे. इथे एकीकडे झालेल्या हिंसाचाराचे फोटो समोर येत आहेत. ज्यामध्ये हिंसक दृश्य सर्वांसमोर येत आहेत. मात्र, दुसरीकडे मात्र सोशल मीडिया या हिंसक फोटोंमध्ये खाकीतील माणुसकीचं दर्शन दाखवणारा एक फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमधील हवालदार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
"तम में प्रकाश हूँ,
— Sukirti Madhav Mishra (@SukirtiMadhav) April 4, 2022
कठिन वक़्त की आस हूँ।"
So proud of constable Netresh Sharma of Rajasthan Police for saving a precious life. This picture is in deed worth a thousand words.. pic.twitter.com/U2DMRE3EpR
'हा' हवालदार कोण आहे?
या व्हायरल फोटोमधील हवालदाराचं नाव नेत्रेश शर्मा असं आहे. नेत्रेश शर्मा करौली शहर चौकीवर हवालदार म्हणून तैनात आहेत. करौलीमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर पोलिसांना पाचारण आले. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आपल्या कामात व्यस्त झाले. दरम्यान, नेत्रेश यांची नजर फुटा कोट परिसरात आग लागलेल्या एका दुकानावर पडली. दुकानामध्ये दोन महिला आणि एक निष्पाप बालक अडकले होते.
जीवाची पर्वा न करत वाचवले प्राण
जीवाची पर्वा न करता नेत्रेश यांनी दुकानात शिरत तिघांनाही बाहेर काढले. नेत्रेश यांनी बालकाला छातीशी घेऊन धावत दुकानातून सुखरुप बाहेर काढले. प्राणाची बाजू लावून निरपराधांना वाचवल्याने नेत्रेश यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचं कर्तव्याप्रती असलेलं समर्पण पाहून सर्वांनीच त्यांना सलाम करत आहेत. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
करौली में अपना कर्तव्य निभाते हुए 4 लोगों की जान बचाने वाले कांस्टेबल श्री नेत्रेश शर्मा से फोन पर बात कर उन्हें शाबासी दी। श्री नेत्रेश को हेड कांस्टेबल के पद पर पदोन्नत करने का निर्णय किया है। अपनी जान की परवाह ना कर कर्तव्य निभाने वाले श्री नेत्रेश का कार्य प्रशंसनीय है। pic.twitter.com/3p4ekYNYhn
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) April 4, 2022
मुख्यमंत्र्यांकडून मिळालं 'हे' बक्षीस
नेत्रेश यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही नेत्रेशचे जोरदार कौतुक केले. गेहलोत यांनी बक्षीस म्हणून नेत्रेश यांना बढती देऊन त्यांची हेड कॉन्स्टेबल पदी नियुक्ती केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत गेहलोत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Karauli Violence : करौलीत दगडफेक, हिंसाचार आणि जाळपोळ, आतापर्यंत 46 जणांना अटक; कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवला
- Delhi : चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीत मांसबंदी, महापौरांची घोषणा
- Viral Video : आरशात स्वत:चेच प्रतिबिंब पाहून घाबरला कुत्रा, पुढे असं काही केलं की...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha