Delhi : चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण दिल्लीत मांसबंदी, महापौरांची घोषणा
Delhi News : दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी चैत्र नवरात्रीच्या काळात मांस दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Delhi News : देशाची राजधानी दिल्लीतील दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने चैत्र नवरात्रीच्या काळात मांस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 2 एप्रिलपासून सुरू झालेली चैत्र नवरात्र 11 एप्रिलला संपणार आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी सांगितले की, नवरात्रीच्या काळात दिल्लीतील 99 टक्के लोक लसूण आणि कांदा वापरत नाहीत. त्यामुळे दक्षिण एमसीडीमध्ये मांसाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचं मुकेश सूर्यन यांनी सांगितलं आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारला जाईल. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरांनी सांगितले की, भविष्यात आम्ही या अटीसह परवाना देखील जारी करू. दरम्यान महापौरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवरात्रीच्या काळात दारू विक्री बंदी करावी आणि शक्य झाल्यास नऊ दिवस दारू विक्री बंद करण्याची विनंती केली आहे.
Keeping in view the sentiments of the public, necessary directions may be issued to officers concerned to take action for the closure of meat shops during the 9-day period of Navratri festival from 2nd April to 11th April:Mukkesh Suryaan, Mayor, South Delhi Municipal Corporation pic.twitter.com/VbeMQCie5q
— ANI (@ANI) April 4, 2022
मुकेश सूर्यन यांचं पत्र
दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर यांनी पालिका आयुक्त ज्ञानेश भारती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, 'लोक नवरात्रीच्या काळात मंदिरांमध्ये जातात. या दिवसात लोक कांदा आणि लसूणही वापरत नाहीत. मात्र मंदिरांजवळ मांस विकले जाते. जेव्हा लोक मांसाच्या दुकानाजवळून जाताना किंवा मंदिरात जात असताना त्यांना मांसाचा दुर्गंधी येतो तेव्हा त्यांच्या धार्मिक श्रद्धेवर परिणाम होतो. तसेच काही मांस दुकानांतील कचरा गटारात किंवा रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच टाकला जातो. त्यामुळे कुत्रेही फिरतात."
त्यांनी म्हटले की, 'नवरात्रीच्या काळात दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील आणि मंदिराजवळील मांसाची दुकाने बंद ठेवल्यास स्वच्छता राखली जाईल.'
महत्त्वाच्या बातम्या :
- Jammu Kashmir Attack : दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितांवर निशाणा, एका दिवसात तिसरा हल्ला
- Russia Ukraine War : बुचा शहरात रस्त्यांवर मृतदेहांचा खच, चर्चजवळ 45 फुट लांब स्मशानभूमी, सॅटेलाईट फोटोंमधून दिसला नरसंहार
- Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत सरकारविरोधी निदर्शनं सुरूच, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)