एक्स्प्लोर
Advertisement
सचिन माळीला जामीन, चार वर्षांनी सुटका!
नवी दिल्ली : नक्षली चळवळींशी संबंध आणि समाजात रोष पसरवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या सचिन माळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सचिन माळीसोबतच सागर गोरखे आणि रमेश गायचोर या तिघांनाही जामीन देण्यात आला आहे.
कबीर कला मंचचा कार्यकर्ता सचिन माळीने पत्नी शितल साठेसह एप्रिल 2013 मध्ये विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती.
परंतु न्यायालयाने शीतल साठेची जामीनावर सुटका केली, तर सचिन माळी अटकेतच होता. मात्र अद्यापही सचिनविरोधातील खटल्याची सुनावणी सुरु न झाल्याने कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि आनंद पटवर्धन देखील उपस्थित होते. सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांवर नक्षलवादी चळवळींशी संबंध ठेवणे आणि समाजात असंतोष पसरवण्याचे आरोप आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement