(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी: न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीशपदी नियुक्ती, 9 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार
Justice DY Chandrachud: राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
Justice DY Chandrachud: राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड याची 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपति ने जस्टिस धनंजय यशवंत चंद्रचूड़ को देश का अगला चीफ जस्टिस नियुक्त किया। 9 नवंबर से पद संभालने वाले जस्टिस डी. वाई.चंद्रचूड़ देश के 50वें मुख्य न्यायाधीश होंगे। उनका कार्यकाल 10 नवंबर 2024 तक होगा। pic.twitter.com/LGzTDR5F7O
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) October 17, 2022
याबाबत माहिती देताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, "भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे." किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Extending my best wishes to Justice DY Chandrachud for the formal oath taking ceremony on 9th Nov. https://t.co/awrT3UMrFy pic.twitter.com/Nbd1OpEnnq
— Kiren Rijiju (@KirenRijiju) October 17, 2022
दरम्यन, मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. सर्वाधिक काळ CJI राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूडच्या नावावर आहे. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश राहिले आहेत.