Job : 86 टक्के कर्मचारी येत्या सहा महिन्यात नोकरीचा राजीनामा देणार, एका अहवालातून स्पष्ट
वर्क- लाईफ बॅलेन्स करण्यासाठी 61 टक्के भारतीय कर्मचारी कमी पगाराची नोकरी स्वीकारण्याच्या किंवा कोणतीही वाढ किंवा प्रमोशन नसलेली नोकरी स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचं हा अहवाल सांगतोय.
मुंबई: येत्या सहा महिन्यामध्ये तब्बल 86 टक्के कर्मचारी हे आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर 61 टक्के भारतीय कर्मचारी हे आपल्या वर्क-लाईफ बॅलेन्स सांभाळण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी कमी पगाराची नोकरी, जास्त पगार वाढ नसलेली नोकरी किंवा प्रमोशन न मिळणारी नोकरीही स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. नोकरी आणि भरतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मिशेल पेज एजन्सीने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ही धक्कादायक माहिती दिली आहे.
कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावेळी बहुतांश कंपन्यानी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं होतं. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कंपनीत बोलवायला सुरूवात केली. त्यामुळे गेल्या काही कालावधीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याचा मार्ग निवडला. आता येत्या सहा महिन्यामध्ये यामध्ये तीव्रतेने वाढ होणार असून 81 टक्के कर्मचारी सध्या काम करत असलेल्या ठिकाणचा राजीनामा देतील असं मिशेल पेज या संस्थेने म्हटलं आहे.
येत्या काळात कर्मचारी हे सध्याची नोकरी सोडून इतर नोकऱ्यांकडे स्थलांतरीत होण्याची जास्त शक्यता असून त्यासाठी कंपन्यांनी तयार राहिलं पाहिजे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
कोरोना काळात बहुतांश कंपन्यांच्या धोरणामध्ये बदल झाले आहेत. भारतीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर समाधानी जीवन जगण्याला त्यांनी झुकतं माप दिल्याचं स्पष्ट आहे. वर्क-लाईफ बॅलेन्स सांभाळण्यासाठी, आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी त्यांनी गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकरीलाही रामराम करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच प्रमोशन नसेल तरी चालेल किंवा पगार वाढ नसली तरी चालेल पण घर आणि कामामधील बॅलेन्स करता आला पाहिजे, मग त्यासाठी कमी पगाराची नोकरीही भली असा विचार कर्मचारी करत आहेत. तब्बल 61 टक्के कर्मचाऱ्यांची ही मानसिकता असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
61 टक्के भारतीय कर्मचारी असमाधानी

कोरोनामुळे कंपन्यांच्या बदललेल्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असमाधानाचं वातावरण असल्याचं दिसतंय. त्यामुळे आतापर्यंत 11 टक्के कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय.