एक्स्प्लोर
देशविरोधी घोषणांवर समाजाचं मौन देशासाठी घातक : अजित डोबाल
पुणे : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी पहिल्यांदाच जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजीवर मत व्यक्त केलं आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या देशविरोधी घोषणांवर मौन बाळगणं, हे देशासाठी घातक असल्याचं डोबाल म्हणाले. अजित डोबाल काल पुण्यात बोलत होते.
जेव्हा काही लोक देश तोडण्याची भाषा करतात तेव्हा इतरांनी त्यावर सामूहिक प्रतिक्रिया देणं गरजेचं असतं. भारत केवळ 125 कोटी लोकांचं पोट भरत नाही तर बाहेरच्या देशातही अन्नधान्य निर्यात करतो. त्यामुळे राष्ट्रशक्ती एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत डोबाल यांनी व्यक्त केलं.
डोबाल म्हणाले की, जे लोक देशासाठी बलिदान करत नाही, ते रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करतात. भारताचे तुकडे करण्याची भाषा करतात. त्यांनी दिलेली 'भारत तेरे टुकडे होंगे, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह' ही घोषणा महत्त्वाची नाही. पण समाजातील लोक याविरोधात काय प्रतिक्रिया देतात हे अधिक महत्त्वाचं आहे.
दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारी रोजी देशविरोधी घोषणा देत संसद हल्ल्याचा दोषी आणि दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या, ज्यावरुन मोठा वादाला तोंडही फुटलं होतं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement